ठाणे : येथील उपवन परिसरात नाताळनिमित्ताने वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त उपवन जेट्टी येथे ख्रिसमस ट्री उभारण्यात येणार असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच लोकमान्यनगर-शास्त्रीनगर विभाग व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी ’संस्कृती कला-क्रीडा महोत्सवाचे येणार आहे. त्यात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे तर, लकी-ड्रॉ मधील विजेत्यांना गृहपयोगी वस्तु दिल्या जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाण्यात बेकायदा केबलचे जाळे कायमच; इंटरनेट तसेच इतर वाहिन्यां काढण्याची पालिकेची कारवाई थंडावली

संस्कृती युवा प्रतिष्ठान व प्रताप सरनाईक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत हा फेस्टिवल होणार आहे. तसेच लोकमान्यनगर-शास्त्रीनगर विभाग व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी ’संस्कृती कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संस्कृती कला-क्रीडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. यामध्ये बुध्दिबळ, कॅरम, क्रिकेट, स्विमिंग, चित्रकला, रांगोळी, पाककला, गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मिस व मिसेस लोकमान्यनगर व होम-मिनिस्टर या विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये लहान मुलांपासून, महिला, पुरूष ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धक सहभागी होत असतात. स्थानिकांच्या कला-गुणांना वाव मिळावा आणि आपली कला जोपासावी या उद्देशातून या महोत्सवास सुरूवात केली असल्याची माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाअंतीम सोहळा, बक्षिस समारंभ आणि महिलांसाठी ‘होम-मिनिस्टर खेळ पैठणीचा’ ही विशेष स्पर्धा सुद्धा घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी लकी-ड्रॉ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये फ्रीज, सायकल, वॉशिंग मशीन, फूड प्रोसेसर, स्मार्ट टीव्ही, गॅस स्टोव्ह, मायक्रोवेव्ह, व्हॅक्युम क्लिनर, वॉटर प्युरिफायर, साऊंड बार, प्रिंटर अशी बक्षिसे लकी-ड्रॉ विजेत्यांना देण्यात येणार आहे. या महोत्सवांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्कृती युवा प्रतिष्ठानचे पुर्वेश सरनाईक यांनी केले आहे.

हेही वाचा >>> ठाणे: वन्यजीवांची तस्करी करणारे अटकेत; पाच जंगली पोपट, १६ कासव जप्त

२८ डिसेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त कुणीही पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल व भेटवस्तू देऊ नये, त्याऐवजी गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, तसेच गरजूंना अन्न-धान्य अश्या स्वरूपात साहित्य अथवा सामान मला द्यावे, जेणेकरून आपण ते त्यांच्यापर्यंत पोहचवू, असे आवाहन पुर्वेश सरनाईक यांनी केले आहे.