भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : डोंबिवलीतील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेसमोरील सुतिकागृहाच्या जागेवर १५० रुग्ण शय्येचे कर्करोग रुग्णालय आणि ५० खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे. या सुतिकागृहाच्या जागेवर कर्करोग रूग्णालय उभारले जावे यासाठी वेगाने निवीदा प्रक्रिया राबवली जावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्यंतरी आदेश दिले होते. असे असताना सहा महिने उलटून गेले तरीही ही निवीदा प्रक्रिया पुर्ण होत नसल्याने महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी अभियंत्यांना फैलावर घेतल्याचे वृत्त आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील मोक्याच्या जागेवर सुतिकागृहाची जागा आहे. मागील १० वर्षाच्या काळात सुतिकागृहाच्या जागेवर रूग्णालय उभारणीचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न फसला. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्यंतरी सुतिकागृहाच्या जागेवर १५० खाटांचे कर्करोग रुग्णालय आणि ५० खाटांचे सामान्य रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मांडला. खासदार शिंदे यांच्या पुढाकारामुळे कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला. यासाठी महापालिकेने पाच महिन्यापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्याला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महापालिकेकडून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा या ३० वर्षाच्या तत्वावर हे रुग्णालय खासगी संस्थेला देण्याचे ठरले आहे. मात्र या निवीदांना पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने शहरातील आरोग्य सेवेसाठी महत्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प रखडला आहे.

आणखी वाचा-उधळलेल्या रेड्याचा कल्याणमध्ये धुमाकूळ

निवीदांच्या शुध्दीपत्रकांचा भडीमार

कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी पालिकेने चार महिन्यापूर्वी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा प्रक्रियेतील अटीशर्ती बदलण्यासाठी पाच वेळा शुध्दीपत्रके काढण्यात आली आहेत. यासारख्या महत्वाच्या कामांच्या अटी शर्ती सातत्याने का बदलाव्या लागतात याविषयीचे उत्तर देण्यास अभियांत्रिकी विभागातील एकही वरिष्ठ अधिकारी तयार नाही.

आयुक्तांकडून कानउघडणी

कर्करोग रुग्णालय उभारणी निविदा प्रक्रियेचा आढावा घेताना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी ही प्रक्रिया का लांबवली जात आहे, असे प्रश्न करून अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचे वृत्त आहे. ही प्रक्रिया लवकर मार्गी लावा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. यासंबंधी अधिक माहितीसाठी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांना संपर्क साधला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कर्करोग रुग्णालय उभारणी निवीदा प्रक्रियेची पूर्व चर्चा बैठक बुधवारी बोलविली आहे. तांत्रिक अडचणीमुळे शुध्दीपत्रक काढली. अ्न्य कोणतेही कारण नाही. -तरूण जुनेजा, कार्यकारी अभियंता