ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटने प्रकरणी दोन्ही गटांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राडा झाला त्यावेळेस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढले. श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. घटनेनंतर ठाकरे गटाकडून समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यात गुंडाराज सुरू आहे का? असा आरोप ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; दोन्ही गटाकडून परस्पर गुन्हे दाखल
श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Written by लोकसत्ता टीम
ठाणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-11-2022 at 11:32 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Workers of thackeray group were brutally beaten both groups filed mutual cases shinde v thackeray group mp vichare thane tmb 01