मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वृक्षवेलींचा हिरवा शेजार लाभला आहे. या उद्यानातील ठाण्याकडील बाजूस येऊर आहे. या जंगलात अनेक वैशिष्टय़पूर्ण आणि दुर्मीळ वृक्षसंपदा आहे. जगभरातील पक्षी काही काळ पाहुणे म्हणून येऊरला भेट देत असतात. पावसाळ्यातील येऊरचे सौदर्य केवळ अप्रतिम असते. पावसाळ्यात येऊरमध्ये काय काय पहावे, याचा हा एक सचित्र आढावा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ईशान्येच्या आसमंतातून आलेला तेजस्वी पक्षी ‘ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशर’

निसर्गाने प्रफुल्लित झालेल्या जंगलामध्ये सध्या तेजस्वी अशा ‘ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशर’ पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू असून या पक्ष्यांचे दर्शन येथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. अत्यंत तेजस्वी आणि विविधरंगी पक्ष्याच्या केवळ उपस्थितीमुळेच परिसराला एक नवचैतन्य येते. त्यामुळेच पावसाळ्यात येऊरच्या जंगलामधील अतिसौंदर्यवान पक्षी म्हणून तो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.  नेपाळ, बंगाल, सिक्कीम, भूतान, आसाम, नागालॅंड, मिझोरामच्या टेकडय़ा, बांगलादेश आणि पश्चिम घाटात हा मोठय़ा संख्येने आढळतो. पानगळी आणि सदाहरित वनांमध्ये त्याची उपस्थिती अधिक असते. जून ते सप्टेंबर हा काळ त्याचा विणीचा हंगाम असून त्यासाठी हा पक्षी खास येऊर आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये दाखल होत असतो. या काळात हा पक्षी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मामाभांजे डोंगर, येऊर टेकडी, नागला, तुंगारेश्वर, मुंब्रा टेकडय़ा येथे पाहायला मिळतो.

छोटा पण तेजस्वी :  या पक्ष्याची लांबी अवघी ५.५ इंच इतकी असते. आकाराने अत्यंत लहान असलेल्या या पक्ष्याच्या तेजस्वी रंगसंगतीमुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. केशरी रंगाची चोच, पाठीवर जांभळ्या रंगाची झालर आणि वर तपकिरी रंगाच्या निळ्या काळ्या रेषांमुळे हा पक्षी अत्यंत देखणा ठरतो तर पोटाकडील भागाला असलेला नारिंगी-पिवळा रंग लांबूनही या पक्ष्याचे अस्तित्व दाखवून देते. त्याचे पाय केशरी-लाल रंगाचे असतात. या पक्ष्याचे नर आणि मादी पक्षी एकसारखेच दिसतात. असे असले तरी नर पक्ष्यांपेक्षा मादी पक्षी मोठी असते तर मादीपेक्षा नर हा अधिक तेजस्वी असतो.

खाण्याचे चोचले नाहीत: इतर किंगफिशर पक्ष्यांप्रमाणेच गोडय़ा पाण्यातील मासे, कीटक, पाली,चतुर, खेकडे आदी ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशरचे खाद्य आहे. इतर पक्ष्यांचे माशांशिवाय पान हालत नाही. ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर मात्र त्याला अपवाद आहे. लहान पाली किंवा बेडूक पकडून तो दगड आणि झाडाच्या फांद्यांवर आपटून त्यांना ठार मारतो.

घरटी जमिनीवर : हा पक्षी आपले घरटे तयार करताना अत्यंत बारकाईने निरीक्षण करतो. तो दाट जंगलातील झऱ्यांच्या काठावरील उतार असलेल्या जमिनीमध्ये बीळ तयार करून त्यामध्ये राहतो. नर आणि मादी पक्षी मिळून घरटय़ासाठी बीळ खोदतात. चोचीने जमीन खणून पायाने ते माती बाहेर टाकत असतात. पाच ते सात दिवसांमध्ये हे पक्षी बीळ खोदतात. बाहेरून सामान्य बिळाप्रमाणे दिसणाऱ्या या पक्ष्यांचे बीळ अत्यंत विस्तारित असते. सकाळ- संध्याकाळ आणि दुपारी प्रत्येक अडीच तासांनी हा पक्षी अन्न शोधण्यासाठी बाहेर पडत असतो. मात्र पिलाच्या जन्मानंतर या पक्ष्यांची खाद्यासाठी दर १५ मिनिटांनी भटकंती सुरू असते.

सवयी : अत्यंत स्वच्छ असलेला हा पक्षी पाण्यामध्ये अंग साफ करतो. सूर्यप्रकाशामध्ये सुकणे या गोष्टी आवर्जून करतो. नर आणि मादी पक्षी एकमेकांची निवड करताना अत्यंत दक्ष असतात. घरटय़ाच्या परिसरात आल्यानंतर नर पक्षी मादी पक्ष्याला आवाज देतो. त्यानंतर आलेल्या मादी पक्ष्याला कीटक आणि खाद्य भरवून नरपक्षी तिला आकर्षित करतो. त्यानंतर ते बिळाची

निर्मिती करून प्रजनन करतात. एकावेळी तीन ते सहा अंडी घातली जातात. साधारण १७ दिवसांमध्ये अंडय़ातून पिले जन्माला येतात. या सर्वाना खाद्य भरवण्याचे काम नर आणि मादी दोन्ही पक्षी करतात. त्यानंतर ही पिले मोठी झाल्यानंतर पक्षी घरटे सोडून देतात. काही नैसर्गिक आपत्तीमुळे पिले अंडय़ातून बाहेर येण्यापूर्वी नष्ट झाल्यास हे पक्षी पुन्हा नव्याने प्रजनन करतात. ठाण्यातील निसर्ग अभ्यासक आदित्य सालेकर याने या विषयी तीन वर्षांपासून या बाबींच्या नोंदी केल्या आहेत.

‘ओरिंएन्टल डॉर्फ किंगफिशर’ पक्ष्यांसमोरील आव्हाने..

  • अतिवृष्टीच्या भागामध्ये सरकणाऱ्या जमिनीच्या पृष्टावर या पक्ष्याची घरटी सहज आढळतात.
  • पावसाच्या योग्य प्रमाणांवरही या पक्ष्यांच्या वीणीचा हंगाम यशस्वी ठरतो.
  • वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूलाही हा पक्षी घरटे करत असल्याने अपघात होऊन मृत्यू मुखी पडणाऱ्या पक्ष्यांची संख्या जास्त असते.

वेध विषयाचा येऊरमध्ये हे पाहता येईल

  • मुळातच लाभलेले नैसर्गिक सौंदर्य येऊरला अधिक श्रीमंत करते. त्यामुळे हिरवाईने नटलेल्या येऊरच्या सान्निध्यात गेल्यावर कुणीही पर्यटक मोहित होतो.
  • पाहण्यासाठी विशिष्ट असे ठिकाण नसले तरी लहान झरे, तलाव या ठिकाणी पावसाळ्यात निसर्गाचा उत्तम अनुभव घेता येतो.
  • येऊरमधील जांभूळपाडा या ठिकाणी तलावाजवळ कमळाची बहरलेली फुले पुढील दोन महिन्यात पाहता येतील.
  • येऊरमध्ये प्रवेश केल्यावर खदाणीच्या दिशेने एका टेकडीपाशी पोहचल्यावर संपूर्ण ठाणे शहर एका नजरेत सामावता येते.
  • येऊरपासून हाकेच्या अंतरावर असलेले मानपाडा येथील निसर्ग पर्यटन केंद्र देखील पर्यटकांना पाहण्यासाठी उत्तम आहे.

पर्यटक, छायाचित्रकारांनी घ्यावयाची काळजी

  • ओरिएन्टल डॉर्फ किंगफिशर या पक्ष्याचे छायाचित्रण खास करुन या पक्ष्यांच्या घरटय़ासाठी केले जाते. जंगलात मातीच्या लहान भिंत पोखरुन हे पक्षी आपली अंडी घालतात. छायाचित्रकारांनी या पक्ष्याचे छायाचित्रण करताना संबंधित ठिकाणापासून विशिष्ट अंतर राखणे आवश्यक आहे. छायाचित्रण करणे चुकीचे नाही, मात्र छायाचित्रकारांनी पक्षांची सुरक्षितताही विचारात घ्यायला हवी. छायाचित्रणासोबत पक्ष्यांविषयी प्रेम असणे आवश्यक आहे, असे पर्यावरणप्रेमी आदित्य सालेकर याने सांगितले.
  • जंगलात विहार करताना अनेकदा पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. काही पर्यटक हे आवाज भ्रमणध्वनीमध्ये रेकॉर्ड करुन जंगलात पुन्हा वाजवतात. यामुळे प्रजननाच्या प्रक्रियेत असलेल्या पक्ष्यांना अडथळा निर्माण होतो. या पक्ष्यांची जोडी तुटण्याची भीती असते. पर्यटकांनी या गोष्टीचे भान राखत अशा प्रकारचे गैरवर्तन करु नये.
  • पावसाळ्यात येऊरमध्ये असणाऱ्या खदाणीत डुबक्या मारुन अंघोळ करण्याचा मोह आवरत नाही. मात्र काही खदाणी खोल असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे धोक्याचे आहे. याशिवाय प्राणी, पक्ष्यांसाठी असणारे पाणी दूषित होत असते
  • पर्यटकांनी आपल्याजवळ मद्य बाळगल्यास येऊरच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, जेवणासाठी प्लास्टिकची ताटे पर्यटकांनी आपल्या जवळ बाळगणे निसर्गाच्या दृष्टीने घातक आहे. पार्टी करणे हा उद्देश न ठेवता पावसाळ्यातील जैवविविधतेचा आनंद अनुभवण्यासाठी पर्यटकांनी येऊरची वाट धरावी.

कसे जाल : ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटिसवरुन येऊरला जाण्यासाठी ठाणे महानगर परिवहनची बस सेवा उपलब्ध आहे. तसेच उपवनला जाणाऱ्या बसेस येऊरच्या पायथ्याजवळ जाण्यास योग्य ठरतात. सॅटिसच्या खालच्या बाजूला रिक्षा थांबा आहे तेथून रिक्षाही उपलब्ध आहे. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी पूर्वद्रुतगती मार्गावरुन कॅडबरी जंक्शनच्या डावीकडून सरळ गेल्यावर येऊरच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

सर्व छायाचित्रे:  आदित्य सालेकर, सीमा हर्डिकर आणि पराग शिंदे.