कल्याण – कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावातील तलावावर आपल्या नातेवाईकांसह गणपती विसर्जनासाठी आलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीला तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यावेळी तिच्या नातेवाईकालाही मारहाण झाली. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.

अंजली हरीश ठाकूर असे मारहाण झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती मलंगगड रस्ता भागातील आडिवली भागात राहते. सोमवारी अंजली आपल्या नातेवाईकांसह नांदिवली तर्फ गावातील तलावावर गणपती विसर्जनासाठी गेली होती. त्यावेळी रात्रीचे साडेअकरा वाजले होते. विसर्जन करुन घरी पायी येत असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी सैफ अली खान, राम तिवारी, स्काय गुलाम, सत्यम, भावेश आणि विशाल (पूर्ण नाव नाही) आणि त्यांच्या साथीदारांनी अंजलीला रस्त्यात अडवले. तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. अंजलीचे नातेवाईक तिच्या बचावासाठी पुढे आले तर टोळक्याने त्यांनाही मारहाण केली. टोळक्यातील एका तरुणाने जवळील चाकूने अंजलीला दुखापत केली.

stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Extension of the Sadanika Lottery Scheme of PMRDA Pune news
पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

हेही वाचा – कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक ठप्प, खर्डी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड

हेही वाचा – ठाणे : भविष्यातील रेल्वे प्रकल्प रखडलेले

मारहाणीनंतर सात ते आठ तरुण घटनास्थळावरून पळून गेले. अंजलीने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. ढेंबरे तपास करत आहेत.