ठाणे: प्रेयसीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरूणाने मित्राची निर्घृण हत्या करून त्याचे गुप्तांग कापून ते त्याच्या तोंडात कोंबल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोहम्मद खान (२१) असे मृताचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटने अस्लम अन्सारी याला अटक केली आहे.

भिवंडी येथील फातमानगर भागात सोमवारी सकाळी एका उपहारगृहाचा मालक मोहम्मद खान याचा धारदार शस्राने डोक्यावर, डोळ्यावर जखम केलेल्या आणि गुप्तांग तोंडात कोंबलेल्या अवस्थेत एक मृतदेह शांतीनगर पोलिसांना आढळून आला होता. या हत्येप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटकडून सुरू होता.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
man dies after falling into hole dug in Chembur by mumbai municipality
चेंबूरमध्ये पालिकेने खोदलेल्या खड्यात पडून इसमाचा मृत्यू, कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा : मनसेचा सायंकाळी हर हर महादेव चित्रपटाचा मोफत शो; राष्ट्रवादी-मनसे समोरासमोर येण्याची शक्यता

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे याप्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळेस यातील आरोपी हा मोहम्मदचा मित्र अस्लम असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
अस्लम याची प्रेयसीच होती. प्रेयसीचे आणि मोहम्मदचे प्रेमसंबंध असल्याचा संशय अस्लमला होता. या वादातून तो मध्यरात्री मोहम्मदच्या उपहारगृहात गेला होता. तिथे त्याने त्याला लाकडी वस्तूने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याने त्याच्या डोक्यात, डोळ्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर त्याचे गुप्तांग छाटले आणि ते तोंडात कोंबले. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Story img Loader