लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मंगळवारी सकाळी लोकलमधून पडून एका वीस वर्षाच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. आठवड्यातून एक ते दोन प्रवासी डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मरण पावत असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

आयुष जतीन दोशी (२०) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. आयुषने मंगळवारी सकाळी नऊ वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक पाचवरून सीएसएमटीकडे जाणारी अतिजलद लोकल पकडली. नेहमीप्रमाणे त्याला गर्दीतून आत जाता आले आहे. त्यामुळे तो दरवाजात आधार दांड्याला धरून लोंबकळत प्रवास करत होता.

आणखी वाचा-कल्याणमधील चिकणघर येथील मालमत्ता कर थकविणारा पेट्रोल पंप सील, मालमत्ता कर विभागाची कारवाई

डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर लोकलने वेग घेतला. आतून प्रवाशांचा रेटा दरवाजातील प्रवाशांवर वाढू लागल्याने लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या आयुषला आपला तोल सांभाळणे कठीण झाले. त्याच्या शरीर आणि हातावर प्रवाशांचा भार आल्याने तोल जाऊन तो डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गात पडला. तो गंभीर जखमी झाला होता. तो पडताच प्रवाशांनी ओरडा केला. तोपर्यंत लोकल पुढे गेली होती. डोंबिवली लोहमार्ग पोलीस, कोपर रेल्वे स्थानकातील कर्मचारी, इतर प्रवाशांनी तातडीने जखमी आयुषला कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दाखल करण्यापूर्वीच तो मयत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-कथोरेंविरूद्ध निष्ठावंतांची आघाडी ? कपिल पाटलांच्या नेतृत्वात मेळावा, कथोरेंना अप्रत्यक्ष आव्हान देण्याची खेळी

डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून मरण पावणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. याविषयी रेल्वे प्रशासनाने योग्य विचार करून निर्णय घेण्याची मागणी उपनगरी रेल्वे महिला प्रवासी संघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात ५०० हून प्रवासी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून मरण पावले आहेत. तर हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.