लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदर: भाईंदर पश्चिम येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरभवन या शासकीय इमारतीजवळ असलेल्या मांडवी तलावात बुडून तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या अग्निशमन विभागाने मृत शरीराला पाण्याबाहेर काढले असून भाईंदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अमित दास (३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भाईंदर पश्चिम येथील फाटक रोड जवळ असलेल्या एका इमारतीमधला रहिवासी आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्ती पाण्यात बुडाला असल्याची तक्रार महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अग्निशमन जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन अमित दास या तरुणाला पाण्याबाहेर काढले. मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत सोनसाखळी चोरांना अटक

तरुणाचा मृत्यू पोहत असताना झाली की ही आत्महत्या होती याचा अद्यापही शोध लागला नसल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे. तर मांडवी तलाव हे पालिकेच्या शासकीय कार्यालयाला लागून आहे. त्यामुळे त्याठिकाणी अशी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.