scienceमू र्ती छोटी, कीर्ती मोठी’ या शब्दात निमिषचे वर्णन करता येईल. स्वातंत्र्यसनिक कै. यमुताई साने व अण्णा साने यांचा नातू. समाजवादी चळवळीतील कार्यकर्ता संजीव साने आणि प्रा. डॉ. नीता साने यांचा निमिष हा एकुलता एक मुलगा. पण ही त्याची ओळख नव्हती. सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी असलेला निमिष शाळेत हुषार व गुणी विद्यार्थी म्हणून सर्वाचा लाडका होता. चौथी व सातवीत शिष्यवृत्तीधारक, पाचवी व आठवी गणित प्रज्ञा परीक्षेत सुवर्णपदक आणि दहावी शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत ९वा, अशी त्याच्या शालेय कारकिर्दीची चढती कमान अभिमानास्पद होती. शालेय अभ्यासात आघाडीवर असतानाच इयत्ता सहावीमध्ये भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत त्याने रौप्यपदक मिळवले होते.

१९९५मध्ये सातवीत असताना निमिषने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभाग घेतला होता. जिज्ञासा ट्रस्टचे बाल विज्ञान परिषदेत काम करण्याचे ते पहिलेच वर्ष होते. मात्र, पहिल्याच वर्षी निमिष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय पातळीवर मजल मारली. त्या वर्षीचा मुख्य विषय होता, स्वच्छ करूया भारत. शंतनु घारपुरे या गटनेत्याच्या सोबत मिलिंद आचार्य, निनाद वैद्य आणि अनुप जावडेकर हे निमिषचे सहकारी होती. या गटाने मासुंदा तलावावर अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या अन्न पदार्थातील भेसळ व प्रदूषण यांचा अभ्यास केला होता. विकले जाणारी भेळपूरी, पॅटिस, सरबत, पाणी यांचे नमुने गोळा करून ते त्यांनी वेगवेगळ्या दिवशी प्रयोग शाळेतून तपासून घेतले. फेरीवाल्यांचे निरीक्षण केले. या सर्व माहितीतून किती प्रमाणात दूषित व आरोग्यास घातक असलेले पदार्थ विकले जातात याची त्यांनी नोंद केली. हेच पदार्थ घरी तयार करून त्याचेपण नमुने प्रयोग शाळेतून तपासले होते. या दोन पदार्थात तुलना करता त्याचे निकाल निश्चितच धक्कादायक होते. पुढे या बाल वैज्ञानिकांच्या निष्कर्षांवर आधारित ठाण्यातले जागरूक नागरिक श्री. पणशीकर व नितीन वैद्य यांनी ठाणे कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.कोर्टाने निकाल देताना ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला यावर त्वरित कारवाई करावी असे सुनवले होते.
निमिषने २००५साली मुंबईच्या ‘व्हीजेटीआय’मधून विद्युत अभियांत्रिकी विषयातून स्नातक पदवी प्राप्त केली. हे शिक्षण सुरू असतानाच केवळ आवडीखातर त्याने मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाचा खगोल शास्त्राचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘विद्युत अभियांत्रिकी’ शिकत असताना ‘सिग्नल प्रोसेसिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन’ हा विषय त्याला आवडू लागला. त्यामुळेच पुढे २००५मध्ये अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठ, कॉलेज पार्कमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला तेव्हा त्याने ‘रेडिओ अ‍ॅस्ट्रोनॉमी’ या विषयात संशोधन करण्याचा बेत त्याने आखला. २०१०मध्ये तो ‘एमएस’ झाला. २०११मध्ये त्याने ऑस्ट्रिआ येथील साल्झबर्ग विद्यापिठात सहा महिने संशोधनाचे काम केले. २०११ साली अगदी तरूण वयात त्याने कॉलेज पार्क मेरीलँड विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवली.
40निमिषचा एकंदरितच अभ्यासाचा विषय हा अतिशय गुंतागुतीचा आणि आधुनिक शास्त्रांशी निगडीत आहे. विद्युत व संगणक अभियांत्रिकी या शास्त्रांची सांगड घालून तो रेडिओ खगोल शास्त्रातील रेडिओ अ‍ॅस्ट्रो फीजिक्स संशोधनासाठी निमिषने उपयोगात आणली.
निमिषच्या संशोधनाचा मुख्य विषय हा उच्च दर्जाचे डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग हा होता. डीएसपी तंत्रज्ञान प्रभावी आणि जलद व्हावे म्हणून त्याने डाटा फ्लो मॉडेिलगचा वापर केला. ग्रीन बँक अमेरिका येथील नॅशनल रेडिओ अ‍ॅस्टोनोमी ऑब्झवेटरी (ठअफड) मध्ये त्याला तीन वष्रे काम करण्याची संधी मिळाली. ही त्याच्या दृष्टीने सुवर्णसंधी होती. आपण विकसित केलेली संगणकीय प्रणाली वापरण्याचा अनुभव घेतला. त्याचे हे संशोधनात्मक शिक्षण प्रा. डॉ. शुव्र भटाचार्य आणि खगोल शास्त्रज्ञ प्रा. अ‍ॅन्ड्रयू हॅरिस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग कॉम्पुटर एडेड डिझाइन गटात काम केले. उच्च दर्जाची उ१ी ऋ४ल्लू३्रल्लं’ िं३ं ऋ’६ (उाऊा) नावाची नाविन्यपूर्ण, प्रभावी संगणकीय प्रणाली बनविण्यात निमिषचा महत्वपूर्ण वाटा होता. या मॉडेलचा उपयोग अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान (हट्रअ) आणि 3 ॅढढ यात केला जात आहे. अशा रितीने रेडिओ संदेश वहनात व पर्यायाने त्यावर अंवलबून असणाऱ्या जीवन उपयोगी सुविधांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो.
डॉक्टरेट झाल्यावर निमिष सेंटर फॉर सोलर टेरेस्ट्रिअल रिसर्च, भौतिक शास्त्र विभाग, न्यू जर्सी इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, न्यूजर्सी अमेरिका येथे कार्यरत होता.या काळात त्याने अमेरिकेतील कॅलिफोíनया राज्यात ओवेन्स वॅली रेडिओ ऑब्जवेटोरी येथे असलेल्या एक्स्टेंडेड ओवेन्स वॅली सोलर अरे या दुर्बणिीसाठी डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग उपकरणे तयार करण्याचे काम केले. त्याचबरोबर एंबेडेड डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, रॅपिड प्रोटोटायिपग आणि मॉडेल-बेस्ड डिजाइन या विषयांवर त्याचे संशोधन चालू होते. सध्या निमिष अमेरिकेत मॅथवर्क्‍स या कंपनीत अ‍ॅप्लिकेशन सपोर्ट इंजिनीअर म्हणून काम करीत आहे.
निमिष साने सारखे तरूण शास्त्रज्ञ व तंत्र अभियंते आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करीत आहेत. केवळ भारत देशाच्या नव्हे तर आंतराराष्ट्रीय खगोल शास्त्र मोहिमांना तंत्रज्ञानाच्या माध्यमाने अधिक उंचीवर नेत आहेत. ही लेखमाला लिहण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठे यांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या अथवा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आज आधुनिक क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्या विषयांचे संशोधन चालते याची कल्पना यावी.

Story img Loader