चंदनवाडीत १८ दुचाकी जाळल्याप्रकरणी तरुणाला अटक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे : पाचपखाडीतील चंदनवाडीमध्ये १८ दुचाकी जाळल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. याप्रकरणी एका तरुणाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. या भागात महिनाभरात अशी ही दुसरी घटना घडली आहे. या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांचे जीव धोक्यात आले होते. मात्र, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.

गौरव महेश पालवी (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो चंदनवाडी भागात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत उभारलेल्या तीनपैकी एका इमारतीत राहतो. या तिन्ही इमारतींच्या आवारात रहिवासी वाहने उभी करतात. मंगळवारी पहाटे गौरवने त्यापैकी एका दुचाकीच्या पेट्रोलची नळी काढून तिला आग लावली. ही आग इतरत्र पसरल्यामुळे त्यात बाजूच्या दुचाकीही जळाल्या. ११ दुचाकी जळून भस्मसात झाल्या तर ८ दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. या आगीत लाँड्रीसह पहिल्या मजल्यावरील एका घराचे नुकसान झाले. या आगीच्या झळा इमारतींच्या

वरच्या मजल्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यामुळे काही घरांच्या काचा फुटल्या. ‘ए’ विंगच्या प्रवेशद्वारजवळच दुचाकींनी पेट घेतल्यामुळे रहिवाशांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते. मात्र, या इमारती एकमेकांना जोडण्यात आलेल्या असल्यामुळे रहिवाशी गच्चीवर जाऊन ‘बी’ विंगमधून खाली उतरले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन अध्र्या तासात ही आग विझविली. एक अग्निशमन बंब आणि एक पाण्याच्या टँकरने ही आग विझविण्यात आली.

सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न

इमारती खाली उभ्या असलेल्या दुचाकींना आग लावली तर इमारतीमधील रहिवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात, हे माहीत असताना गौरव याने हे कृत्य केल्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३०८ अंतर्गत आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी इतर कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्वामी यांनी दिली.

गुन्ह्य़ाचा उलगडा

या इमारतीमधील इशा लाँड्रीचे मालक प्रशांत भोईर यांचे काही कारणांवरून गौरव पालवीच्या नातेवाईकांशी भांडण झाले होते. यासंदर्भात नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. संशयावरून गौरवला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने या गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्याला एकच दुचाकी जाळायची होती. मात्र, आग पसरल्यामुळे १८ दुचाकी जळाल्या. यापूर्वी त्याला हाणामारी करण्यासाठी जात असताना पकडले होते आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.