ठाणे : कापूरबावडी येथील नळपाडा भागात दिवसाढवळ्या एका व्यक्तीने तलवारीने तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार धुळवडीच्या दिवशी उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात ध्रुव चौहाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> Video :लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, काळ्या फिती लावत आंदोलनद्वारे महिलांनी केला मध्य रेल्वेचा निषेध
नळपाडा येथे जखमी तरुण राहत आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार तो मंगळवारी दुपारी धुळवडी निमित्ताने बाहेर पडला होता. त्यावेळी येथील स्थानिक पळत असताना त्याला दिसले. तरुण देखील या गर्दीमधून पळत जात असताना मागून ध्रुव चौहाण हा तलवार घेऊन तलवार फिरवत येत होता. ध्रुवने तरुणावर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला रोखण्यासाठी तरुणाने हात पुढे केल्याने त्याच्या हाताच्या पंजाला दुखापत झाली. त्यानंतर ध्रुव हा तलवार घेऊन निघून गेला. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.