डोंबिवली: मी मुली बरोबर बोलत आहे. तुम्ही मध्ये का येता म्हणून एका तरुणाने मुलीच्या वडिलांना प्रश्न केला. ती माझी मुलगी आहे. मी तिच्या बरोबर बोलणारच, असा प्रश्न करताच संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या साथीदारांसह वडिलांना बेदम मारहाण केली आहे. लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत मुलीच्या वडिलांचा चेहरा, जबडा विद्रुप करण्यात आला आहे.
तेजस नाईक (२९, रा. देसई गाव, शिळफाटा) असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. ते सुरक्षा रक्षक आहेत. संदेश सुंदर पाटील (३०), स्वप्नील पावशे (२७, रा. देसई गाव) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, तेजस नाईक हे आपल्याला मुलीला घेऊन एका कार्यक्रमाकरिता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आले होते. कार्यक्रमाच्या मध्यंतरा दरम्यान मुलीला भेटावे म्हणून तेजस मुलीला भेटण्यासाठी गेले. तेव्हा मुली जवळ संदेश सुंदर पाटील हा तिच्या जवळ उभा होता. तेजस मुली जवळ जात असताना संदेशने मुलगी सिध्दीका हिच्याशी बोलण्यास आणि तिच्या जवळ येण्यास वडील तेजस यांना मज्जाव केला.
हेही वाचा: दोन हजार कोटींच्या कामांसाठी एकाच दिवसात निविदा; ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण
सिध्दीका माझी मुलगी आहे. मी तिला भेटणार, बोलणारच असे वडील तेजस बोलल्यावर रागाच्या भरात संदेशने तेजस यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यावरच न थांबता संदेशने आपले मामा भालचंद्र तळवटकर यांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी संदेशचा मित्र स्वप्निल पावशे आला. दोघांनी मिळून तेजस नाईक यांना पु्न्हा बेदम मारहाण केली. या झटापटीत तेजस यांचा मोबाईल गहाळ झाला. तेजस यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.