करोना नंतर अखेर दोन वर्षाने ठाण्यातील मासुंदा तलाव, राम मारुती रोड, गोखले रोड परिसरात तरुणाईनी मोठ्या जल्लोषात दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला. या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी राजकीय मंडळींकडून विविध चौकात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेली तरुणाई डिजे आणि ढोलताशाच्या तालावर थिरकली.
करोनामुळे गेले दोन वर्ष सर्वच सण-उत्सव साध्यापद्धतीने साजरे करण्यात आले होते. यंदा करोना प्रादूर्भाव ओसरला असून निर्बंधांमध्येही शिथीलता आणण्यात आली आहे. त्यामुळे यंदा सर्व सण-उत्सव नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात साजरे केले जात आहेत. ठाणे शहराला गेले अनेक वर्षांपासून दिवाळी पहाट ची परंपरा लाभली आहे. परंतू, या दिवाळी पहाट ला करोनामुळे गेले दोन वर्ष ब्रेक लागला होता. मात्र, यंदा तरुणाईंना आकर्षित करण्यासाठी राजकीय मंडळींकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले. गेले
हेही वाचा : डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष
दोन वर्ष दिवाळी पहाट न झालेल्यामुळे हिरमोड झालेल्या तरुणाईनी यंदाच्या दिवाळी पहाटला मोठ्यासंख्येने गर्दी केल्याचे दिसून आले. पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या या तरुणमंडळींमुळे चैतन्याचे वातावरण पसरले होते. तसेच या तरुणाईंना आकर्षित करण्यासाठी राजकीय मंडळींकडून चौकाचौकाट डीजे तसेच ढोलताशा पथकाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा तुम्ही नादचं केला एक, काँलेज का बच्चा, झिंगाट यागाण्यांसह जुन्या रिमिक्स गाण्यांवर तरुणाईंनी ताल धरल्याचे दिसून आले. तर, वेगवगळ्या राजकीय गटामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तरुणाईचे लक्ष वेधण्यासाठी बक्षिसांची लूट करण्यात आली.