जिवलग मित्रांची सोबत, मद्यासह खाद्यपदार्थाच्या मेजवान्यांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी, शुभेच्छांचा वर्षांव अशा भारलेल्या वातावरणामध्ये ठाणेकरांनी नवीन वर्षांचे स्वागत केले. तलावपाळी परिसरामध्ये एकत्र जमून अनेक ठाणेकरांनी नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत केले. तरुणाईचा त्यामध्ये मोठा सहभाग होता. मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबकबिल्यासह अनेक ठाणेकर या वेळी रस्त्यावर उतरले होते. सुशोभित फटाक्यांची आतषबाजी करत तर काही तरुणांनी गाण्याचा सूर आळवत नव्या वर्षांचे स्वागत केले. ठाण्यातील तलावपाळी, गोखले रोड, राममारुती रोड, उपवन परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजला होता, तर काही ठिकाणी तरुणांनी रक्तदान शिबिरांसारखे उपक्रम राबवत सामाजिक भानही जपण्याचा प्रयत्न केला.

 

Story img Loader