लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरुध्द नवी दिल्लीत सुरू असलेल्या महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कल्याण शहर युवक काँग्रेसतर्फे सोमवारी कल्याण मधील छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Nitin Gadkari campaign Miraj, Suresh Khade,
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित, नितीन गडकरी यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

महिला कुस्तीपटुंनी खा. बृजभूषण सिंह यांच्या विरुध्द लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. खा. सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, त्यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचा… कल्याणमधील सह दुय्यम निबंधकाला ‘एसआयटी’ची नोटीस, डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील सदनिकांची दस्त नोंदणी

ठिय्या आंदोलनात कल्याण शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयजित सिंह, प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र चोरघे सहभागी झाले होते. सहभागी कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला. सरकार खा. सिंह यांची पाठराखण करत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. खा. सिंह यांच्या विरुध्द गुन्हा दाखल होऊन पाच महिने झाले तरी त्यांना अटक करण्यात येत नसल्याने कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.