भिवंडी येथील दिवागाव भागात ट्रक अंगावरून गेल्याने अक्षय हुंभरे (१८) याचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>कल्याण, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची सेरेनिटी स्वास्थम कंपनीकडून कोट्यवधीची फसवणूक
दिवागाव येथे अक्षय हा बुधवारी दुपारी त्याच्या मित्रासह दुचाकीने भिवंडीत जात होता. त्यांची दुचाकी दिवागाव येथे आली असता, दुचाकी घसरली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रक अक्षयच्या अंगावरून गेला. या घटनेत अक्षय याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.