डोंबिवली– मलेशियन एअरलाईन्समध्ये नोकरीची संधी आहे असे आमिष दाखवून मुंबईतील कांदिवली भागातील एका नागरिकाने डोंबिवलीतील एका तरुणाकडून पाच लाखाहून अधिकची रक्कम उकळली. त्यानंतर नोकरी नाहीच, पण उरलेले पैसे भामट्याने परत न केल्याने तरुणाने मानपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीत नाल्याचा कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता

मार्च २०१९ ते आजपर्यंतच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. आदित्य दीपक दीक्षित (रा. श्री जी रेसिडेन्सी, संघवी गार्डन, मानपाडा रस्ता, डोंबिवली) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रदीप सिध्दार्थ ढोणे (रा. त्रिवेणी टॉवर्स, न्यू म्हाडा टॉवर्स, कांदिवली पश्चिम, मुंबई) असे फसवणूक करणाऱ्या नागरिकाचे नाव आहे.

हेही वाचा >>> मुंबई- नाशिक महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी कोंडी

पोलिसांनी सांगितले, आरोपी प्रदीप ढोणे यांनी चार वर्षापूर्वी तक्रारदार आदित्य यांच्याशी ओळख काढली. आदित्य यांना आरोपीने आपली मलेशियन विमान कंपनीत ओळख आहे. तेथे ॲडमिरल एव्हिएशनमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे, असे सांगितले. आदित्य यांनी प्रदीपच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. प्रदीपने प्रशिक्षणाच्या नावाखाली आदित्यकडून पाच लाख २० हजार रुपये उकळले. पैसे देऊन झाल्यानंतर आदित्य यांनी आपणास प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी कधी मिळेल म्हणून प्रदीपकडे विचारणा सुरू केली. तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला. आरोपीच्या वेळकाढूपणामुळे आदित्यला तो आपणास फसवत आहे असे जाणवले. काम होणार नसेल तर आदित्यने प्रदीपकडे पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. प्रदीप त्याला दाद देत नव्हता. सततच्या पाठपुराव्याने आरोपीने आदित्यला दोन लाख २० हजार रुपये परत केले. चार वर्षाच्या कालावधीत उर्वरित तीन लाखाची परत करण्यास प्रदीपने नकार दिल्याने आदित्यने प्रदीप विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth in dombivli cheated for rs 5 lakh with the lure of a job zws
Show comments