कल्याण – जुन्या भांडणाच्या रागातून शहाड जवळील मोहने रस्ता येथे आयडिया कंपनी परिसरात राहत असलेल्या एका कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी या भागातील एका २८ वर्षाच्या तरूणाने दिली आहे. या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी मेघनाथ कोट या तरूणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीजवळ चार लाखाचे जनावारांचे मांस जप्त

Police seized prohibited animal meat worth rs 4 lakh near dombivli zws 70
डोंबिवलीजवळ चार लाखाचे जनावारांचे मांस जप्त
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
two youths molested young woman in ​​Kalyan arrested
कल्याणमध्ये तरूणीची छेड काढल्याने,दोन गटात हाणामारी
on Monday man killed on the roof of a building in Kolshet
ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Bandra Worli Sea-Link tiepl
Mumbai Accident : वांद्रे-वरळी सी-लिंकवर शर्यतीच्या नादात भीषण अपघात; BMW व Mercedes च्या धडकेत टॅक्सी उलटली
divorced woman commits suicide by jumping from building balcony in kalyan
कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या
fog on railway track
कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा

मीना महावीर जाधव असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. मीना यांचा मुलगा आणि आरोपी मेघनाथ कोट यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मेघनाथ याच्या मनात होता. बुधवारी रात्री मीना जाधव पत्राचाळ भागात आपल्या कुटुंबीयांसह घरात होत्या. त्यावेळी आरोपी मेघनाथ कोट मीना जाधव यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागला.

हेही वाचा >>> कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा

मीना यांनी याप्रकरणी मेघनाथला जाब विचारला. त्यावेळी मेघनाथने मीना यांचा गाऊन फाडला. त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आईला मारहाण केली जात आहे म्हणून मीना यांचा मुलगा विजय, मुलगी काजल भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडली. त्यावेळी मेघनाथ याने मी येथला स्थानिक गाववाला आहे. मला कोणी काही करू शकत नाही. असे बोलून तुमचे कुटुंबाला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. मेघनाथ कोट याच्यापासून आपल्या कुटुंबाला धोका निर्माण होण्याची भीती असल्याने मीना जाधव यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. ए. एस. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते तपास करत आहेत.