आपल्या एका सहकाऱ्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन कल्याण मधील एका रहिवाशाने दुर्गाडी किल्ल्या जवळील कोन गावातील एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तरुणाच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार गोविंदवाडी रस्त्यावर घडला.

पुणे : मेटे यांच्या पत्नीला विधानपरिषद आमदार करा ; शिवसंग्राम संघटनेची मागणी

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक

गुलजार रहिम शेख (२५, रा. गुलशन सोसायटी, कोनगाव, भिवंडी) असे तक्रारदाराचे नाव आहे. तो नोकरी करतो. अश्फी मद्दु (२५, रा. गोविंदवाडी, कल्याण) असे आरोपीचे नाव आहे. बैलबाजार भागातील गोविंदवाडी रस्त्यावरील सुन्नी गोसिया मस्जिद जवळ हा प्रकार घडला आहे.पोलिसांनी सांगितले, गुलजार आणि त्यांचा मित्र हे दुचाकीवरुन आपल्या मित्राला भेटून परत कोन गाव येथे शुक्रवारी रात्री चालले होते. यावेळी गोविंदवाडी रस्त्यावर आरोपी अश्फी याने गुलजार याला थांबण्यास सांगितले. त्याच्याशी वाद घातला. आणि काही कळण्याच्या आत हाता मधील दांडक्याने गुलजार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘तु पोलिसांचा खबरी आहे. तु पोलिसांना सगळी माहिती पुरवत असतो. तु माझी माहिती पोलिसांना दिली म्हणून पोलीस माझ्या घरी आले’ असे म्हणत गुलजार यांना अश्फी याने शिवीगाळ केली. त्याच्या हात, पायावर लाकडी दांडक्याचे फटके मारल्याने गुलजार जमिनीवर कोसळला. ‘तुला बघतो’ अशी धमकी देत आरोपी अश्फी घटना स्थळावरुन पळून गेला. गुलजारच्या साथीदाराने गुलजारला पोलीस ठाणे आणि रुग्णालयात नेले. गुलजारच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अश्फी याने गुलजारला मारहाण केल्याने कोनगाव भागात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Story img Loader