तरुणांच्या साहित्य, कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना आपले विचार, कलागुण व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि डोंबिवली शाखेतर्फे रविवारी (ता. २७) डोंबिवलीत युवा साहित्य नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी युवा नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत.

हेही वाचा >>>ठाणे ग्रामीण परिसर दोन वर्षात पाणी टंचाई मुक्त होणार?

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Nikhil Rajeshirke
‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेता निखिल राजेशिर्के अडकला लग्नबंधनात
bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”

डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाजवळील माऊली सभागृहात दिवसभराच्या या संमेलनात रंगभूमी, तरुणांच्या एकांकिका, नाटकांमधील शोकांतिका या विषयावर विचारसत्र, सादरीकरण होणार आहे. ग्रंथ प्रदर्शन विक्रीसाठी सभागृहात स्वतंत्र दालन असणार आहे.ज्येष्ठ नाट्य कलावंत दिवंगत राम मुंगी रंगमंचावर होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्षा संपदा जोगळेकर यांच्या हस्ते सकाळी पावणे दहा वाजता होईल. त्यानंतर विवेक वडगबाळकर आणि त्यांचे सहकारी नांदी सादर करतील. दुपारी १२ वाजता ‘रंगभूमीची बदलती रुपे’ विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहनी, ज्येष्ठ नाटककार शेखर ढवळीकर, ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर, ज्येष्ठ गायिका शुभदा दादरकर सहभागी होणार आहेत. या विचारसत्राचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर भूषविणार आहेत.

हेही वाचा >>>भिवंडीत कोट्यवधी रुपयांचा पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त

दुपारी सव्वा दोन वाजता ‘दंगल’ ही एकांकिका मंच मंथन मंडळीतर्फे रुपेश गांधी आणि कलाकार,”सा. विद्या या विमुक्तय” ही एकांकिका के. जे. सोमय्या महाविद्यालयातर्फे प्रा. प्रसाद भिडे आणि कलाकार, ‘जीर्णोध्दार’ ही एकांकिका कल्याणच्या अभिनय संस्थेचे मनाली राजश्री आणि कलाकार, ‘टिन्नीस’ ही एकांकिका कलरफूल माॅक संस्थेचे नचिकेत दांडेकर आणि कलाकार सादर करणार आहेत.‘नाटकातील शोकांतिका’ या विषयावर अध्यात्मिक शास्त्राचे गाढे अभ्यासक वामनराव देशपांडे विचार मांडतील. संमेलनाध्यक्षा संपदा जोगळेकर यांच्या भाषणाने युवा नाट्य संमेलनाचा समारोप होईल. महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे अध्यक्ष वामनराव देशपांडे, कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, उपाध्यक्ष दीपाली काळे, कार्यवाह उमा आवटेपुजारी, वि. दा. पिंगळे, माधव राजगुरू यांनी युवा नाट्य संमेलनाचे नियोजन केले आहे.