गणिताचा व आनंद, सुख-समाधानाचा काय संबंध, असे कुणीही म्हणेल. पण गणिताची एक पायरी चुकली की पुढच्या सगळ्या पायऱ्या चुकतात तसेच माणसाच्या जीवनाचे, पर्यायाने आनंदाच्या संकल्पनेचे आहे. अलीकडेच वैज्ञानिकांनी माणसाच्या आनंदाचे भाकीत करणारे एक गणिती समीकरण शोधून काढले आहे. तुम्ही कुणालाही ‘कसे आहात?’ विचारले तर, वरकरणी ती व्यक्ती ‘आनंदात’ हे बेतीव उत्तर देते. दुसऱ्यांना हसवणारी व्यक्ती स्वत: आनंदी असतेच असे नाही. समाजातील बहुतेक माणसे आनंदात असल्याचा आभास निर्माण करतात. पण आता तुमचा आनंदाचा हा बुरखा खरा की खोटा हे समीकरण सहज ठरवू शकते. तुमचे आयुष्य आनंदात चालले आहे की, कुठेतरी दु:खाची किनार आहे याचा शोध हे समीकरण घेते. प्रत्येक क्षणाला तुमच्या मन:स्थितीचे विश्लेषण त्या काळात घडलेल्या घटनांच्या आधारे हे समीकरण करते. निर्णयक्षमतेच्या कामांमध्ये तुमच्या अपेक्षा व तुम्हाला मिळणारी शाबासकी किंवा बोलणी याची नोंद त्यात घेतली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संशोधन काय?
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन या ब्रिटनमधील ख्यातनाम संस्थेने आनंदाचे समीकरण तयार केले असून जगातील १८ हजार लोकांच्या सुखाचे भाकीत करण्यास त्याचा वापरही करण्यात आला आहे. या प्रयोगात २६ जणांना निर्णयक्षमतेची कामे देण्यात आली. त्यांच्या पर्यायातून त्यांचा आर्थिक फायदा-तोटा ठरत होता व त्यांना नेहमी तुम्ही आता सुखी आहात का, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. सहभागी व्यक्तींच्या मेंदूतील क्रियांचे चित्रण एमआरआय स्कॅन तंत्राने करून वैज्ञानिकांनी सुखाचे गणनात्मक प्रारूप तयार केले व तुम्ही शाबासकी व अपेक्षांना दिलेल्या प्रतिसादावरून सुखाचे स्ववार्ताकन ऐकून हे समीकरण तयार करण्यात आले. कशामुळे मला सुख वाटते नावाचा एक स्मार्टफोन गेमही त्यांनी स्मार्टफोन अ‍ॅपमध्ये तयार केला. त्याला ‘द ग्रेट ब्रेन एक्सपिरिमेंट’ असे नाव आहे. हेच समीकरण वापरून लोकांच्या सुखाचे भाकीत करता येते हे त्यांना हा गेम वापरत असलेल्या व्यक्तींच्या भावनांवरून दिसून आले. यात सहभागी व्यक्तींना गुण मिळत होते पैसे नव्हे, तरीही त्यांचा आनंद अवर्णनीय होता. थोडक्यात, सुख हे पैशात नसून अगदी साध्या गोष्टींमध्ये आहे हे आता मानसशास्त्राबरोबरच गणितानेही सिद्ध केले आहे. मानसशास्त्राला गणिती भाकितांची जोड म्हणजे आणखी पक्के मनोविकारांचे निदान असाही याचा अर्थ आहे.

ठळक मुद्दे कोणते?
पैसा म्हणजे आनंद, सुख नव्हे हे या समीकरणाने सिद्ध केले आहे. कारण यात पैसा हा कुठेच सुखाचा निदर्शक नाही. प्रत्येक क्षणाला तुम्ही आनंदी असता की दु:खी यावर त्यात भर दिलेला आहे. अपेक्षांच्या बाबतीत सांगायचे तर त्या व्यक्तीपुढे अपेक्षा पूर्ण करण्यासाठी असलेले पर्याय फलश्रुती ठरवत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्यावर त्याच्या जीवनातील सुख-दु:ख अवलंबून असते. आपण निर्णय घेत असतो व त्याची फलश्रुतीही आपल्याला दिसत असते, मिळत असते. ती फलश्रुती नेमकी काय असेल, याचे भाकीत या समीकरणाने केले जाते.

उपयोग काय?
वैज्ञानिकांच्या मते अशा प्रकारे गणितीय अवस्थेतील गणनात्मक आकडे डॉक्टरांनाही तुमचा मूड ठीक करण्यास कालांतराने उपयोगी पडतील. आपल्या भावना खूप वेगाने हिंदोळे घेत असतात. स्मार्टफोनवर खेळ खेळतानाही छोटासा विजय आश्वासक वाटतो. आपला मूड म्हणजे मन:स्थिती आनंदी व दु:खी का बनते हे जीवनातील घटना व प्रसंग ठरवत असतात. त्यात काही वेळा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तर कधी ती बदलण्याची हिंमत काही जण दाखवतात. या गणिती समीकरणाची भाकिते पाहून मानसरोगतज्ज्ञांना औषधयोजनाही करणे शक्य होणार आहे.

आनंदी डेन्मार्क
डेन्मार्क हा सुखी लोकांचा देश मानला जातो. ब्रिटनच्या वॉरविक विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञांनी सुखकारक घटकांचा शोध घेतला असता त्यांनी जगाच्या नकाशावर डेन्मार्क देशावर बोट ठेवले आहे. या स्कँडेनेव्हियन देशात खरोखर सुख ज्याच्या त्याच्या दारात पाणी भरते. त्या देशामध्ये शिस्त, पर्यावरणरक्षण असे अनेक मुद्दे आहेतच, पण तिथल्या अन्नाशीही त्याचा संबंध आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्न, धर्म, संस्कृती व भूगोल यांच्याशी तुमचे सुखाचे गुपित जुळलेले आहे. दुसऱ्या एका संशोधनानुसार १३१ देशांच्या अभ्यासात डेन्मार्क हा सुखी देश आहे. कारण तेथील लोकांची विशिष्ट जनुके वेगळी आहेत जी आखूड नाहीत. सुखाचे हे जनुक आखूड नसले तर तुम्ही सुखी राहू शकता. त्याचा संबंध सेरोटोनिन या मानसिक स्थिती सांभाळणाऱ्या संप्रेरकाशी आहे. हे जनुक काहींमध्ये आखूड तर काहींमध्ये लांब असते. डेन्मार्क व त्याखालोखाल नेदरलँड्समधील लोकांमध्ये ते लांब असते, हे वेगळे सांगायला नको.