मृत्यूनंतरही मानवी शरीरात जागृतावस्था काही काळापुरती कायम असते. म्हणजेच माणूस मरणानंतरही जिवंत असतो, असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो आहे. मरणानंतर मानवी देहातील मेंदूचे कार्य पूणपणे ठप्प होते, परंतु काही काळापुरती जागृतावस्था असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या संशोधनाविषयी.
नवी माहिती
पाचपकी एकाने तीन मिनिटांच्या काळात एकप्रकारची शांती अनुभवली. यातील एक तृतीयांश व्यक्तींनी काळाची गतीच मंदावल्याचा अनुभव आल्याचे सांगितले. काहींना तर डोळ्यांसमोर सोनेरी प्रकाश आणि सुर्य भासमान झाला. काहींना कुणीतरी खोल पाण्यात खेचतय, असे वाटले, तर काहींना भीतीने घेरले. यातील १३ लोकांना आपण शरीरापासून वेगळे होत असल्याचे अनुभवास आले. तर तितक्याच लोकांनी आपल्या संवेदना अधिक तीव्र झाल्याचे सांगितले. मृत्यूच्या वेळी अनेकांच्या संवेदना अधिक तीव्र होत असाव्यात पण उपचारादरम्यान त्यांना देण्यात येणारया औषधांमुळे अथवा गुंगीमुळे तसेच मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने ते तो अनुभव घेऊ शकत नसावेत, असाही दावा संशोधकांनी केला आहे. यातील नेमकेपणा शोधायचा झाल्यास अधिक संशोधनाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
पुढे काय?
मृत्यूनंतर काय, हा प्रश्न खरेतर अनेकांच्या दृष्टीने गरलागू असतो. आजवर जगात सर्वत्रच मृत्यूनंतर स्वर्ग, नरक आणि मोक्ष अशाच संकल्पनांवर चर्चा होत आहे. पण त्याला पुरावा अद्याप तरी सापडलेला नाही. सध्या संशोधकांनी जो दावा केला आहे, तो अनेकांनी वादग्रस्त ठरवला आहे. काहींच्या मते हा सारा भ्रम-विभ्रमाचा खेळ आहे. पण भौतिक साधनांच्या मदतीने हे काही प्रमाणात सिद्ध झाले आहे. पुढे जर यावर अविरत संशोधन चालू राहिले तर कदाचित काही ठोस निष्कर्ष काढता येऊ शकतील, असे मत नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड वाइल्ड यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केले. पाíनया आणि त्यांच्या गटाने अतिशय नाजूक आणि सहजासहजी मुठीत न येऊ शकणारया मुद्द्यावर पथदर्शी संधोधन केले आहे. यातून पुढील संशोधनाला बळ मिळायला हरकत नाही.
संशोधन काय?
साऊदम्प्टन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ गेली चार वष्रे इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रियातील सुमारे १५ रुग्णालयांतील हृदयविकाराने मरण पावलेल्या हजारो लोकांची मृत्यूनंतरची शारीरअवस्था आणि क्रियाअन्वयन पडताळून पाहत होते. त्यात त्यांना असे दिसले, की ४० टक्के व्यक्तींना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले असले तरी त्यांच्या शरीरातील जागृतावस्थेची काही लक्षणे त्यांच्यात दिसून आली.
साऊदम्प्टन येथील ५७ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्यांला तीन मिनिटांसाठी मृत घोषित करण्यात आले. तरीही त्याच्यासभोवती असलेल्या परिचारिका आणि त्यांच्या हालचालींची तपशीलवार माहिती आणि उपचार कक्षातील यंत्रांचा आवाज त्याने ओळखला होता.
जेव्हा हृदयप्रक्रिया बंद पडते, तेव्हा मेंदूचे कार्यही थांबलेले असते, हे आम्हाला ठाऊक आहे, परंतु हृदयप्रक्रिया बंद पडून पुढील २० ते ३० सेकंदात मेंदूचे कार्य थांबूनही जागृत बोधावस्था पुढे तीन मिनिटांसाठी कायम असते, असे साऊदम्प्टन विद्यापीठाचे माजी संशोधक डॉ. सॅम पाíनया यांनी सांगितले. डॉ. पाíनया यांच्याच नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. वैद्यकीयदृष्ट्या मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीने अतिदक्षता विभागातील व्यक्तीने बोधावस्थेत काही गोष्टी हेरल्या, महत्त्वाचे म्हणजे नंतरच्या तीन मिनिटांच्या अवकाशात मशीन्समधील दोन ब्लीप्सही त्याने ऐकल्या होत्या. त्या व्यक्तीने जे काही ऐकले होते, ते आमच्या टीमला विश्वासार्ह वाटले, इतकेच मी संशोधनानंतर सांगू इच्छितो, असे पाíनया म्हणाले. आमच्या पुन्हा जिवंत होण्याच्या संकल्पनेनुसार २०६० जणांना हृदयविकाराचा झटका आला. ३३० जण जिवंत राहिले, तर १४० जणांनी बोधावस्थेतील आवाज, स्थितीचे वर्णन केले. यातील बहुतेकांना विशिष्ट अशा संवेदना निश्चित करण्यात आल्या नाहीत, पण काही संकल्पना मांडण्यास आमच्या संशोधनाला त्यांच्याकडून बळ मिळाले.