महाराष्ट्राचे गिरिस्थान असलेले आंबोली हे जैवविविधतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्थळ आहे. संपन्न वन्यजीव संपदा असलेल्या या जंगलात अभ्यासकांची भटकंती सतत सुरू असते. पावसाळा सरल्यानंतर तर या साऱ्या जंगलालाच जणू जाग येते. नुकत्याच झालेल्या वर्षां ऋतूने सारी हिरवाई पाणी पिऊन तृप्त झालेली असते. या हिरवाईतच निसर्गाची नवलाई दर्शन देऊ लागते. यामध्ये फुलपाखरांची दुनिया आघाडीवर असते. सप्टेंबर- ऑक्टोबर हा या फुलपाखरांचा विणीचा हंगाम. यामुळे त्यांच्या निरीक्षण – अभ्यासासाठी हाच उत्तम काळ. आम्ही नुकतीच या जंगलाची भ्रमंती केली, यामध्ये या उडत्या फुलांच्या दुनियेने आम्हाला वेडावून सोडले. कॉमन इव्हिनिंग ब्राऊन, ब्लू ओक लिफ, व्टिनी कोस्टर, प्लेन टायगर, ब्लू टायगर अशी एक ना दोन असंख्य फुलपाखरे. त्यांचे आकार, रंगसंगती सारेच निराळे, भारावून सोडणारे. पावसापाठी उतरलेल्या कोवळय़ा उन्हात त्यांच्या या बागडण्याला जणू खेळकर मुलांचे रूप आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– उपेंद्र सोनारीकर

 

– उपेंद्र सोनारीकर