ट्रेकिंग, गिर्यारोहण, गिरिभ्रमण, आऊटिंग, नेचर ट्रेल..अशी नावे जरी उच्चारली तरी ट्रॅकसूट, बूट, हॅट असा जामानिमा केलेली आणि सॅक, दोर, तंबू असा पाठीवरचा संसार घेऊन डोंगरदऱ्या तुडवणारी जमात डोळय़ांपुढे येते. शहरांच्या गल्लीनाक्यावरून, स्टेशनच्या फलाटावरून आणि अगदी डोंगरपायथ्याच्या एखाद्या गावातून ही फिरस्ती जमात चालू-फिरू लागली, की पाहणाऱ्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेते. त्यांचे ते निराळे कपडे, पाठीवरच्या ओझी बाळगलेल्या सॅक आणि जणू युद्धाला निघाल्याप्रमाणे खांद्यावर अडकवलेले ते दोर, या साऱ्यांबाबत पाहणाऱ्या प्रत्येकालाच कमालीचे कुतूहल असते. कुणी या साऱ्याला डोळय़ांत साठवते, कुणी त्या दोरांना स्पर्श करू पाहते, तर कुणी ही हौस आणि वेड पांघरत या साधन-साहित्य विश्वात शिरू लागते. भटक्यांचे हे सारे विश्व आणि त्याचा हा संसारच निराळा. खडतर वाटांवर आणि अवघड जागांवर चालणारा, मदत करणारा, सांभाळून घेणारा. अशा या संसारातील हे कपडे, बूट, टोप्या, सॅक, तंबू, दोर आणि अन्य तांत्रिक साधने असतात तरी कशी, त्यांचा उपयोग काय, ती वापरायची कशी या साऱ्यांचीच माहिती या ‘बॅकपॅक’मधून आपल्या भेटीला. अगदी त्यांच्या कि मतीपासून ते दिमतीपर्यंत!
फिरस्ता
पाठीवरचा संसार
ट्रेकिंग, गिर्यारोहण, गिरिभ्रमण, आऊटिंग, नेचर ट्रेल..अशी नावे जरी उच्चारली तरी ट्रॅकसूट, बूट, हॅट असा जामानिमा केलेली आणि सॅक, दोर, तंबू असा पाठीवरचा संसार
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-01-2014 at 07:03 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backpack new section of trek it