एके काळी संपूर्ण शहराला तटबंदी होती. आजही काही ठिकाणी तटबंदी दिसते, वेशी आहेत, वेशीबाहेर खंदकावरील पूल आजही कार्यरत आहेत. बहामनी राजांचे मकबरे आहेत. बरीदशाही बादशहांचे मकबरे आहेत. भर बाजारात वॉच टॉवर आहे चौबारा. एका दगडी इमारतीवर हा मिनार आहे. येथील मदरसा म्हणजे एक नवलच आहे. बरीदशाही सरदार महंमद गवान याने हा उभारला. तीन मजली अतिभव्य वास्तू, विद्यार्थ्यांंसाठी वसतिगृह, शिक्षकांसाठी निवासी घरे, हल्लीच्या भाषेत क्वॉर्टर्स. गुरूनानकजी बिदरला येऊन गेल्याचा उल्लेख आहे. त्यांचा गुरूद्वारा आवर्जून पाहण्याजोगा आहे. भुयारातील झरणी नरसींह अनुभवायलाच हवा. सुमारे दोनएकशे मीटर लांबीच्या काळोख्या भुयाराच्या टोकाला बसलेल्या या नृसिंहाचे दर्शन छातीएवढया पाण्यातून हे भुयार पार केल्यावरच होते. याशिवाय अनेक ठिकाणे. खरेतर बिदरवर स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. आज आपण फक्त बिदरचा किल्ला पाहू.

‘हा एक प्रचंड विस्तार असलेला भुईकोटवजा डोंगरी किल्ला आहे. गावाच्या बाजूने जमिनीवर आणि मागील सर्व भाग डोंगरावर. बिदरगावातून प्रवेश करताना आपल्याला प्रथम खंदक पार करावा लागतो. मग आपण पहिल्या गोमुखी दरवाजापाशी येतो. हा पार करून लागतो दुसरा दरवाजा. या दरवाजावरच आहे पहारा व्यवस्थेच्या प्रमुखाचे निवासस्थान. म्हणजे या दोन्ही दरवाजांवर चोवीस तास नजर, खरंच किती कल्पकता आणि सुरक्षा विचार! या नंतर दोन दरवाजे पार करून आपण येतो गुम्बज दरवाजात. ही एक घुमट असलेली छोटीशी इमारत आहे. हिच्यातून रस्ता आरपार जातो.  इतकी सर्व सुरक्षा पार केल्यावर आपण येतो किल्ल्याच्या   अंतर्भागात. आणि डाव्या हाताला आहे रंगीन महाल. हा महाल दक्षिण भारतीय शैलीच्या बांधकामाचा आहे. बाहेरील बाजू हैदराबाद निजामाच्या काळातील आहे. मुख्य महालाची दर्शनी बाजू संपूर्ण लाकडी कोरीव कामाची आहे. शिसवी काळय़ा रंगाचे लाकूडकाम फक्त अप्रतिम आहे. लाकडी छतावर अप्रतिम कोरीवकाम तर आहेच पण मधेमधे निळय़ा आणि लाल रंगाचा वापर करून या नक्षीला खरोखरच चार चांद लावले आहेत. या नंतर प्रवेश होतो मुख्य महालात. येथेही छत आणि भिंतींवर सुरेख नक्षीकाम आहे. काळसर पाश्र्वभूमीवर मोती देणाऱ्या शिंपल्यांच्या अंतर्भागापासून बनवलेली पूड वापरून हे नक्षीकाम केलेले आह.े मेणबत्तीच्या उजेडात हे नक्षीकाम असे काही झळाळून उठते त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. या कारागिरीला म्हणतात मोतीकारी. किती समर्पक नाव! येथे नृत्यगायन होई. जनान्यासाठी वरच्या बाजूला सज्जा आहे तो सहजपणे दिसतही नाही. हा किल्ल्यातील सर्वात जुना निवासी महाल. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अनेक जिने, नोकरांसाठी वेगळे सोपान. वरच्या मजल्यावर अनेक दालने.जनान्यासाठी महाल. मागच्या अंगणात शाही भटारखाना.(निजामी राजवटीत हा कैदखाना केला गेला).

woman decomposed body in fridge
श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
satellite survey Dehurod and Dighis protected area map remains unfinished
‘रेडझोन’ला ‘लाल दिवा?’ सीमेबाबत संभ्रमावस्था कायम; अंतिम नकाशाची प्रतीक्षा
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News: ‘धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करत आहेत’ जरांगे पाटील
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
Maharashtra Mumbai News Today in Marathi
Maharashtra News Updates : परदेशातून येताच छगन भुजबळ सक्रिय; मंत्रिपदाबाबत म्हणाले…

याच्या समोरच आहे एक ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. इतिहासाच्या अभ्यासूंना हा नक्कीच अमोल ठेवा आहे. येथून थोडय़ाच अंतरावर आहे एक भव्य आवार. यात गगनमहाल हा एक भव्य निवासी महाल आहे. येथे आवर्जून उल्लेख करावा अशी काही खास बाब नाही. दुसरा तुर्कीमहाल हा बादशहाच्या तुर्कस्थानी बेगमेकरिता बांधलेला महाल. याचे स्थापत्य तुर्की शैलीतील आहे. हा एक तीन मजली प्रचंड महाल आहे. विलासी निवासस्थान आहे. तुर्की पध्दतीचा हा एक अजोड नमुना आहे. या आवारातील वैशिष्टय़ म्हणजे सोळाखांबी मशीद. ही खासगीतील शाही मशीद फक्त राजघराण्याच्या वापराकरिता होती. हिचे नाव सोळा खांबी असले तरी हिला अनेक खांब आहेत. पण दर्शनी भागात सोळा कमानी मात्र आहेत. या अतिभव्य मशिदीचे छत अनेक खांबांवर तोलले असून वरती अनेक छोटे छोटे घुमट आहेत. ही एक स्थापत्याची खासियत आहे. या छोटय़ा घुमटांमुळे छताची ताकद वाढते. औरंगजेबाने बिदर जिंकून घेतले होते व येथे भेटही दिली होती. त्या वेळी त्याने सोळाखांबी मशिदीच्या भिंतीवर लिहून घेतलेला खुतबा आजही आहे. आणि हे सर्व सुस्थितीत आहे, अवशेषरूपी नाही.

येथून काही अंतरावर (आम्ही गाडी घेऊन गेलो) किल्ल्याच्या आवारातच आहे दिवाण-इ-खास आणि दिवाण-इ-आम. या दोन्ही इमारती आज भग्नावस्थेत आहेत पण एके काळी कशा असतील याची साक्ष देतात. विषेत: दिवाण-इ-आम बारकाईनेच बघायला हवे. येथे सिंहासनाची जागा, सरदारांच्या दरबारातील जागा, आम जनतेचा प्रवेश आणि उभे राहण्याच्या जागा या सर्व बघताना त्याच्यामागे केलेला सुरक्षेचा विचार थक्क करणारा आहे. या शिवाय येथे कचेऱ्यांचे अस्तित्वसुध्दा जाणवते. नळदुर्ग, विजापूरप्रमाणे येथेही उपडय़ा बुरूज आहे.अनेक तोफा आहेत. हा एक अतिप्रचंड किल्ला आहे, यावर अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. निवांतपणे जायला हवे.किल्ला संपूर्ण बघायला दिवस पुरत नाही. आणि एक गोष्ट राहूनच गेली. सर्व इमारती आणि दरवाजांवर निळय़ा मेहेन्दी रंगाच्या टाईल्स बसविल्या होत्या. आज मात्र त्या फक्त अस्तित्व दाखवितात.
या लेखाचा शेवट मात्र महंमद गवानच्या कबरीचा उल्लेख केल्याशिवाय होणार नाही. गावापासून दूर अजिबात वावर नसलेल्या एका आडबाजूच्या वावरात ही कबर आहे. अगदी साधी. कोणाला माहितीही नाही. एकेकाळचा हा बिदरचा सर्वेसर्वा बादशहाचा प्रामाणिक नेक कर्तबगार सरदार. पण बादशहाची मर्जी खफा झाली आणि नशिबी मृत्यू आला. बादशहाला नंतर पस्तावा झाला पण बैल गेला आणि झापा केला! शेवटी कर्नाटक सरकारला धन्यवाद द्यायलाच हवेत या सर्व वास्तूंचे उत्तम जतन केले आहे. सर्व वास्तू कुलूपबंद आहेत. अभ्यासक आणि पर्यटकांसाठी मात्र ती आवर्जून उघडली जातात.

मुंबई-चेन्नई लोहमार्गावरील गुलबर्गा स्थानकावरून बिदरकरिता सतत एस. टी.च्या बस आहेत. सोलापूरवरूनही खूप बसगाडया आहेत. याला जोडून नळदुर्ग, बसवकल्याण आणि गुलबर्गा यांना ही भेट देता येईल. अल्पदरात भोजन निवास उपलब्ध आहे. परिसरही आटोपशीर आहे. थंडीमध्ये जाणे अतिशय सुखावह आहे. काही वेगळे पाहिल्याचे समाधान नक्की लाभेल.

Story img Loader