गिर्यारोहणाचा खेळ-छंद आता सर्वत्रच चांगला रुजू लागला आहे. या विषयाला अधिक व्यापक आणि गुणात्मक करण्याच्या हेतूने पुण्यातील गार्डियन उद्योग समूह आणि गिरिप्रेमी या दोन संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेचा येत्या शनिवारी (दि. २४) पुण्यात जन्म होत आहे. प्रसिद्ध ऑलिम्पियन मुष्टिपटू सरितादेवी हिच्या उपस्थितीत प्रारंभ होणाऱ्या या संस्थेबद्दल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गिर्यारोहण हा शब्द आता सामान्यांच्याही ओठांवर येऊ लागला आहे. एकतर साहसाचे वाढलेले वेड, कुटुंब-समाज-संस्थात्मक पातळीवर दिले जाणारे प्रोत्साहन, शारीरिक कणखरता आणि मानसिक प्रबळतेचे पटलेले महत्त्व आणि या छंद-खेळाला प्राप्त झालेले बहुआयाम या साऱ्यांमुळे डोंगरदऱ्या भटकणाऱ्या पावलांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पण वेगाने वाढू पाहणाऱ्या या विश्वाची जडणघडणीची प्रक्रिया मात्र कासवाच्या गतीने सुरू आहे. यामागे शास्त्रोक्त प्रशिक्षणाचा अभाव, साधनसामग्रीची अनुपलब्धता, तज्ज्ञ-प्रशिक्षकांची वानवा आणि सर्वागीण दृष्टिकोन नसणे आदी घटक दिसून येतात. या साऱ्या मर्यादांचा विचार करतच गिर्यारोहण विश्वातील नवे शिखर आणि दोर बांधणारी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था लवकरच पुण्याजवळ अस्तित्वात येत आहे, ‘गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरिंग’!
सध्या भारतात गिर्यारोहण किंवा अन्य साहसी खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या केवळ चार संस्था आहेत. यामध्ये नेहरू पर्वतारोहण संस्था (उत्तर काशी), हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूट (दार्जििलग), अटलबिहारी वाजजेयी गियारोहण संस्था (मनाली) आणि जवाहर इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरिंग (पहेलगाम) यांचा समावेश आहे. या संस्थांची आजवरची परंपरा, दर्जा आणि त्यांना लाभलेले हिमालयाचे सान्निध्य यामुळे केवळ देशभरातूनच नाहीतर इथे अवघ्या जगातून गिर्यारोहक प्रशिक्षणासाठी येत असतात. याशिवाय भारतीय लष्करातील जवानांनाही याच संस्थांमध्ये गिर्यारोहणाचे धडे दिले जातात. अशा वेळी इथे उपलब्ध होणाऱ्या संधीवर खूपच मर्यादा येतात. तसेच या संस्थांमध्ये आपल्याकडील सह्याद्रीतील गिर्यारोहण, गिरिभ्रमणाचेही प्रशिक्षण मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करतच ‘गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट’ची रचना केलेली आहे. पुणे जिल्हय़ातील मुळशी परिसरातील वळणे येथे सह्याद्रीच्या सान्निध्यात साडेतीन एकर जागेवर या संस्थेची उभारणी केली जात आहे. पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद आणि साहसप्रेमी सुभाष टकले हे या प्रकल्पाच्या वास्तुरचनेवर काम करीत आहेत. या साहस संकुलामध्ये प्रशिक्षणासाठी अद्ययावत इमारत, मोठे सभागृह, तीनशे लोक राहू शकतील असे वसतिगृह, व्यायामशाळा, ग्रंथालय, संग्रहालय, दृक्श्राव्य केंद्र, खेळांसाठी मैदान, साहसी प्रशिक्षणाच्या जागा आदी विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ही सर्व रचना निसर्गपूरक आणि साहसी खेळासाठी प्रोत्साहन देणारी अशी आहे. ही सर्व उभारणी आगामी दीड वर्षांत केली जाणार आहे.
ही संस्था उभी राहिल्यावर इथे प्रस्तरारोहण (रॉक क्लायबिंग), बॅकपॅकिंग, सर्च अॅन्ड रेस्कू, प्रथमोपचार, हिमालयातील गिर्यारोहण (बेसिक, अॅडव्हान्स), आपत्कालीन व्यवस्थापन कौशल्ये, परिसर अभ्यासाचे धडे आदी विविध विषयांचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘गिरिप्रेमी’तर्फे यातील काही अभ्यासक्रम यापूर्वीच प्रायोगिक तत्त्वावर घेण्यास सुरुवात केलेली आहे. या अभ्यासक्रमांची रचना करतानाही केवळ गिर्यारोहण एवढा मर्यादित हेतू न ठेवता या प्रशिक्षणातून एक सुदृढ व्यक्तिमत्त्वाची कशी निर्मिती होईल यावर भर दिलेला आहे. साहसी खेळांच्या या विविध वाटा वरखाली करतानाच स्वयंशिस्त, सांघिक भावना, धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, अभ्यासूवृत्ती, निसर्गाप्रति आदर, संस्कृतीबद्दल प्रेम आणि राष्ट्रभावना आदी मूल्यांना यामध्ये महत्त्व दिले जाणार आहे. सध्या गिर्यारोहण या विषयात तरुणाईचा वावर मोठय़ा प्रमाणात दिसतो. पण या संस्थेतर्फे ‘सर्वासाठी गिर्यारोहण’ हे ब्रीद स्वीकारण्यात आले आहे. याअंतर्गत अगदी शालेय मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्या त्या वयोगटानुसार अभ्यासक्रमांची रचना आणि स्वरूप ठरवलेले आहे. गिरिभ्रमण, गिर्यारोहण हे खेळ आता समाजात सर्वत्रच लोकप्रिय होऊ लागले आहेत. मात्र ही वाढ गुणात्मक न होता संख्यात्मक होत आहे. चांगले गिर्यारोहक आहेत पण त्यांना प्रशिक्षण नाही. जिथे सोय आहे तिथे संधी नाही आणि जिथे संधी आहे तिथे मार्गदर्शनाअभावी दिशा नाही. अशा अवस्थेत वाढीस लागलेल्या गिर्यारोहणाच्या या छंदाला अधिक सुदृढ आणि विधायक करण्यात ‘गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरिंग’ ही संस्था मोठी भूमिका बजावणार आहे.
अभिजित बेल्हेकर -abhijit.belhekar@expressindia.com
भारतातील गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था
* नेहरु पर्वतारोहण संस्था (उत्तर काशी)
* हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिटयूट (दार्जिलिंग)
* अटलबिहारी वाजपेयी गियारोहण संस्था (मनाली)
* जवाहर इंन्स्टिटयूट ऑफ माऊंटेनिअरिंग (पहेलगाम)
गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअरिंग
* साडेतीन एकर जागेवर संस्थेची उभारणी
* अद्ययावत इमारत, सभागृह, वसतिगृह, व्यायामशाळा
* ग्रंथालय, संग्रहालय, दृक्श्राव्य केंद्र, प्रशिक्षणाच्या जागा
* गिर्यारोहणाचे विविध अभ्यासक्रम
उमेश झिरपे
(गिरिप्रेमी- एव्हरेस्ट मोहीम नेता)
करत आहोत.
मनीष साबडे (अध्यक्ष, ‘गार्डियन-गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनिअिरग’)