दरवर्षीप्रमाणे ‘राजगड प्रदक्षिणा’चे आयोजन २६ ते २९ डिसेंबर या दरम्यान नेचर लव्हर्सतर्फे करण्यात आले आहे. गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगडाच्या प्रदक्षिणा मोहिमेचे यंदाचे हे ३०वे वर्ष आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांना ही मोहीम समर्पित करण्यात आली आहे. गडाच्या घेऱ्यातून केली जाणारी ही प्रदक्षिणा म्हणजे इतिहास आणि भूगोलाची सांगड घालणारी आहे. साहसी अनुभवाबरोबरच इतिहासकालिन पारंपरिक पोशाखातील ढोलताशांच्या गजरात मशालींच्या प्रकाशात निघणारी मिरवणूक आणि पारंपरिक खेळ यामुळे थेट इतिहासकाळाची अनोखी अनुभूती घेता येते. इतिहास अभ्यासक अप्पा परब व भगवान चिले यांचे मार्गदर्शन या मोहिमेस लाभणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी राजगड प्रदक्षिणेचा माहितीपट १२ डिसेंबर २०१५ रोजी छबिलदास हायस्कूल, दादर येथे पाहता येईल. मोहिमेत सहभागी आणि अधिक माहितीसाठी नवीन खांडेकर ९८६९५३०१३१ किंवा रश्मी नाईक ७७३८७२२२५६ यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा