गोरेगावच्या नंदादीप विद्यालयीतल ११ वर्षीय ५ विद्यार्थ्यांनी ‘आयसोलेशन झोन’ या संस्थेतर्फे लोणावळय़ाजवळील ८०० फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर यशस्वी चढाई केली. कार्तिक आयरे, प्रथम वडे, नरेश गायकर, रोहन पवार आणि रोहित मानवी या पाच बाल गिर्यारोहकांनी अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी चढाई पूर्ण केली. त्यांना अंजली परब, नेहा मोरे, प्रमोद चव्हाण, सुरज मालुसरे, प्रमोद चव्हाण, प्रेम खिलारी, सौरभ मंडपे आणि अमेय माजलकर यांनी मदत केली.
नागफणी ऊर्फ ‘डय़ूक्स नोज’ हा कडा गिर्यारोहण जगात अवघड श्रेणीतील मानला जातो. ८०० फूट उंचीच्या या कडय़ाचा कोन जवळपास उभ्या रेषेत आहे. यातील शेवटची ३५० फूट उंचीची चढाई तर खूपच कठीण मानली जाते. गिर्यारोहणातील मोठा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साहाय्याशिवाय ही चढाई अवघड मानली जाते. पण गोरेगावच्या नंदादीप विद्यालयीतल या ११ वर्षीय ५ विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांच्या सरावानंतर आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हा नवा इतिहास रचला आहे.
गोरेगावच्या मुलांची ‘नागफणी’वर चढाई
गोरेगावच्या नंदादीप विद्यालयीतल ११ वर्षीय ५ विद्यार्थ्यांनी ‘आयसोलेशन झोन’ या संस्थेतर्फे लोणावळय़ाजवळील ८०० फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर यशस्वी चढाई केली.
आणखी वाचा
First published on: 02-04-2015 at 07:48 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagfani trek in lonavala