सहल, ट्रेकिंग, पदभ्रमण, गिरिभ्रमण, गिर्यारोहण या साऱ्या भ्रमंतीच्या चढत्या भाजण्या आहेत. या साऱ्या प्रवासाचे विश्वच निराळे, याची जीवनशैली निराळी. इथे रुजण्यासाठी, बहरण्यासाठी काही गोष्टींची सवय, अभ्यास, जाणीव, काळजी असावी लागते. या जगातील याच छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची माहिती देणारी ही चौकट दर पंधरवडय़ाने.
पेहराव
 ट्रेकिंगचे जग हे निसर्गाच्या सान्निध्यात, आभाळाच्या उघडय़ा छताखाली आणि डोंगर-दऱ्यांच्या पायवाटेवर धावत असते. तेव्हा या जगात वावरताना पेहरावाला खूपच महत्त्व असते.
* ट्रेकिंग करताना कायम पूर्ण बाह्य़ांचा शर्ट-पॅन्ट  घालावी.
* वाटा-आडवाटांवरून,  जंगल-झाडीतून भटकंती  करताना बिनबाह्य़ांचे शर्ट,  तोकडय़ा पॅन्ट (बर्मुडा,   थ्रि फोर्थ) घालू नये.
* ट्रेकला जाताना डोक्यावर  टोपी आणि पायात बूट असणे आवश्यकच आहे.
* ट्रेक करताना पायात   कापडी किंवा खेळाचे बूट   घालावेत. या बुटाचे तळवे   चांगले असल्याची खात्री   करावी. जेणेकरून अवघड   वाटेवरून खाली-वर   करताना पायांना चांगली   पकड मिळेल.
* चप्पल, सँडलवर ट्रेक   कराल तर थोडय़ाच वेळात   तुमचीच अवस्था फाटकी  होईल.
* भर उन्हात फिरताना   टोपीबरोबरच एखाद्या   मोठय़ा रुमालाने   मानदेखील झाकावी.
* मुक्कामी ट्रेकला जाताना   मोज्यांचा एखादा जादा   जोड बरोबर ठेवावा.
* बाहेर, उघडय़ावर   झोपताना पायात मोजे  घालून तसेच   कान झाकून झोपावे.
* सॅक भरताना रुमाल, नॅपकिन घेण्यास विसरू   नका.
* भटकंतीचे स्वरूप पाहून‘गॉगल’बरोबर घ्यावा.ल्ल ट्रेकिंग हा डोंगरदऱ्यातून चालणारा खेळ असल्याने  कुठलाही पेहराव हा  हलका, कमी वजनाचा असावा. शरीराभोवती घट्ट   कपडे घालू नयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा