‘दी नेचर लव्हर्स’तर्फे येत्या २६ जुलै रोजी लोणावळय़ा जवळील मृगगड किल्ला परिसरात वर्षां भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद पाटील (९८९२६५८४७५) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कास पठार – सज्जनगड
पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

स्वर्गरोहिणी-संतोपंथ मोहीम
कर्दळीवन सेवा संघातर्फे येत्या १३ ते २६ ऑगस्ट दरम्यान स्वर्गरोहिणी-संतोपंथ मोहिमेचे आयोजन केले आहे. हिमालयात बद्रिनाथमार्गे हा ३० किलोमीटरचा साहस, निसर्ग दर्शन आणि अध्यात्माची अनुभूती देणारी पदभ्रमण मोहीम आहे. हिमशिखरे, हिमनद्या, धबधबे, हिमालयातील रानफुले आदी निसर्ग नवलाईचे या मोहिमेत जवळून दर्शन घडते. या मार्गावरून पांडव स्वर्गात गेले अशी समजून असल्याने या मोहिमेला अध्यात्मिक पाश्र्वभूमीदेखील आहे. अधिक माहितीसाठी विनायक (८९८३७८२१०२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरीगड भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या २६ जुलै रोजी कोरीगड भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा हेमलकसा भ्रमंती
‘वसुंधरा’तर्फे ताडोबा जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे.  १२ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत जाणाऱ्या या सहलीमध्ये ताडोबा जंगलाबरोबरच आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, सेवाग्राम आणि पवनार आदी प्रकल्पांनाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.

धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध १० धबधब्यांच्या भटकंतीचे आयोजन केले आहे. ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर, नापणे, मणचे, सावडाव, सैतवडा, आंबोली, कावळेशेत आणि नांगरतास आदी धबधब्यांचा या सहलीत समावेश आहे. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भ्रमंती विशेष आकर्षण ठरणार आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता.
संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’,
प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
Email – abhijit.belhekar@expressindia.com