पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २४ आणि २५ सप्टेंबर दरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

कान्हा जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघांबरोबरच बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे अनेक दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.

नागला निसर्ग भ्रमंती
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नागला परिसरात ‘हिरवाई’ संस्थेतर्फे येत्या
९ ऑगस्ट रोजी निसर्ग पदभ्रमण उपक्रमाचे आयोजन केले आहे. या परिसरात विविध प्रजातींची फुलपाखरे, पक्षी आढळतात. अधिक माहितीसाठी ९६१९७५२१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कळसूबाई पदभ्रमण
‘एसपीआर’तर्फे येत्या १५ ऑगस्ट रोजी कळसूबाई शिखर मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

वरंधाघाट, शिवथरघळ
‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या १५ ऑगस्ट रोजी भोरचा राजवाडा, भाटघर धरण,
वरंधा घाट, शिवथरघळ परिसरात वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

घनगड मोहीम
‘प्रोएज’तर्फे येत्या ९ ऑगस्ट रोजी मावळातील घनगडावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संदीप (९७६३०६२९१३) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader