व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
पश्चिम हिमालयात उत्तराखंडमध्ये उंचीवर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. कुरणांमधील पर्वतीय फुले, चालायला सोपे उतार व विहंगम दृश्ये याकरिता हे खोरे प्रसिद्ध आहे. ब्रूक अनेमोन, जेरानियम, नदीसौंदर्य, हिमालयीन कोलम्बायीन अशी अनेक फुले इथे दिसतात. हेमकुंड तलावाच्या आसपास ब्रह्मकमळ व दुर्मिळ हिमालयीन निळी अफू अशी पर्वतीय फुले दिसतात. पांढऱ्या डोक्याचा गप्पीदास, जल रेडस्टार्ट, पिवळय़ा चोचीचा मेंगपाय व निळा कस्तुर असे पक्षी दिसतात. अशा या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने २३ ते २९ जुलै दरम्यान भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
‘व्ही अॅडव्हेंचर’तर्फे १८ ऑगस्टपासून ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे पदभ्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नितीन बोडस (९८२२३३०४९५) यांच्याशी संपर्क साधावा.
दोडीताल- डवरा टॉप ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’तर्फे ६ ते १५ नोव्हेंबरदरम्यान हिमालयाच्या कुशीत असलेल्या दोडीताल- डवरा टॉप ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
कमळगड पदभ्रमण
‘ट्रेकडी’तर्फे ३० जून रोजी वाई तालुक्यातील कमळगड येथे पदभ्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२०- २५४५४२०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली राजधानी राजगडाकडे जाणाऱ्या राजमार्गावरील काही भागास चालू पावसामध्ये तडे गेल्याचे लक्षात आले आहे. पुरातत्त्व विभागाच्या वतीने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून होत आहे. ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ असलेल्या राजगडाला दररोज अनेक दुर्गप्रेमी भेट देत असतात. पावसाळय़ात या गडाच्या आणि त्याच्या सृष्टिसौंदर्याच्या प्रेमात पडून अनेक जण राजगडाची वाट पकडतात. या गडाला येण्यासाठी वेल्हे तालुक्यातील साखरहून चोरमार्ग, तर पालीहून राजमार्ग आहे. यातील पायऱ्यांचा असलेला राजमार्ग सामान्यांसाठीही सोयीचा पडतो. या मार्गालाच यंदाच्या पावसाळय़ात तडा गेला आहे. पाली दरवाजाखालील या भागात पायऱ्या तुटून मार्ग बंद झाला आहे. पुण्याच्या शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने हा मार्ग नुकताच साफ केला आहे. कारवीची झाडे आणि मातीत गाडलेल्या या पायऱ्या मोकळय़ा केल्यावर यंदाच्या पावसाळय़ात त्याला तडे गेले आहेत. तर एके ठिकाणी पायऱ्यांचा हा भागच वाहून गेला आहे. वाहून गेलेला हा भाग तातडीने दुरुस्त न केल्यास संपूर्ण राजमार्गच बंद होण्याचा धोका आहे.