‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या २० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान लेह-लडाख सफारीचे आयोजन केले आहे. ‘शीत वाळवंट’ म्हणून प्रसिद्ध असलेले लडाख निसर्गसौंदर्याने संपन्न आहे. बर्फाळ पर्वतरांगा, निळेशार तलाव, आगळे वन्यजीवन, सर्वात उंचीवरचे रस्ते, खारदुंगलासारख्या उत्तुंग खिंडी, बौद्ध धर्मस्थळे, राजवाडे आदी अनेक आकर्षणे या सफारीमध्ये दडलेली आहेत. तरी इच्छुकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी विशाल शेटे (९८२०२८४३९१) यांच्याशी संपर्क साधावा.
ठाण्यातील प्रशांत नंदीची निवड
द इंडियन माऊंटेनरिंग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित क्लाइंबथॉन-२०१३ या मोहिमेसाठी ठाण्यातील युवा गिर्यारोहक प्रशांत नंदीची निवड झाली आहे. देशभरातून या मोहिमेत ४०जण सहभागी होतात. हिमाचल प्रदेशमधील अतिशय दुर्गम भागात तब्बल सहा हजार मीटर उंचीवरील डोंगररांगांमध्ये ही मोहीम जाणार आहे. यंदा २० जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या या मोहिमेच्या तयारीसाठी प्रशांत सध्या सराव करीत आहे.
माळढोक अभयारण्य
‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या १३, १४ जुलै रोजी माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नानज अभयारण्याला भेट दिली जाणार आहे. या अभ्यास दौऱ्यात सोबत वन्यजीव अभ्यासक असणार आहेत. तरी इच्छुकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी विशाल शेटे (९८२०२८४३९१) यांच्याशी संपर्क साधावा.
गोव्यातील अभयारण्ये
गोव्यातील सहय़ाद्रीमध्ये चोरला घाट प्रदेश जैवविविधतासंपन्न समजला जातो. म्हादेई, मोल्ले व बोंडला अभयारण्ये या प्रदेशात येतात. या जंगलांमध्ये मलबार करडा धनेश, विविध प्रकारचे बुलबुल व गडद छातीचा सातभाई असे पक्षी दिसतात. प्राण्यांमध्ये शेकरू, सांबर, चितळ, हरण, हरणटोळ, तरंगणारा बेडूक व विविध प्रकारची फुलपाखरे दिसतात. अशा या चोरला घाटात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाऊस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
आंबोली दर्शन
निसर्ग सोबतीतर्फे येत्या १२ ते १४ जुलै दरम्यान आंबोली येथे निसर्ग सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात विविध प्रकारचे पशुपक्षी, पावसाळी वन्यजीवन, रानफुले पाहण्यास मिळतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
‘अॅडव्हेंचर हॉलिडेज’तर्फे २८ जुलै ते ४ ऑगस्ट आणि १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे पदभ्रमणाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८६७३१८४४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रायगड वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या १३ जुलै रोजी रायगड किल्ला दर्शन येथे वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
ट्रेक डायरी: लेह-लडाख सफर
‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या २० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान लेह-लडाख सफारीचे आयोजन केले आहे. ‘शीत वाळवंट’ म्हणून प्रसिद्ध असलेले लडाख निसर्गसौंदर्याने संपन्न आहे. बर्फाळ पर्वतरांगा, निळेशार तलाव, आगळे वन्यजीवन, सर्वात उंचीवरचे
आणखी वाचा
First published on: 03-07-2013 at 09:25 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary