‘उन्नयन’ संस्थेतर्फे २८ व २९ सप्टेंबर रोजी ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी रायगड सहलीचे (रोप-वे मार्गे) आयोजन करण्यात आले आहे. अभ्यासकांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या सहलीमध्ये ज्येष्ठांच्या काळजीसाठी एका डॉक्टरांचीही उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी ९९६७५३४३९६, ९७७३५१०५१३ या क्रमांकावर किंवा ६६६.४ल्लल्लं८ंल्ल.ल्ली३ या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
अरुणाचल सहल
‘अद्वैत जर्नीज’तर्फे आसाम आणि अरुणाचलच्या सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत या भागातील निसर्गस्थळांबरोबर चीन युद्धातील स्मारकांचेही दर्शन घेतले जाणार आहे. अधिक माहितीसाठी रत्नदीप पाटील (९०११०६३४५०) यांच्याशी संपर्क साधावा.
आंबोली जंगल भ्रमंती
महाराष्ट्राचे गिरिस्थान असलेले आंबोली हे जैवविविधतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे स्थळ आहे. संपन्न वन्यजीव संपदा असलेल्या या जंगलात अभ्यासकांची भटकंती सतत सुरू असते. पावसाळय़ात तर धबधबे, रानफुलांमुळे या साऱ्या परिसरातच चैतन्य उमलते. या जंगलातील पावसाळी नवलविशेष पाहण्यासाठी ‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या २४-२५ ऑगस्ट रोजी अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी विशाल शेटे (९८२०२८४३९१) यांच्याशी संपर्क साधावा.
कास पठार – सज्जनगड
पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभ्या खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २१ आणि २२ सप्टेंबरदरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
‘विस्तार भटकंती’ची सहल
कास पुष्प पठारावरच ‘विस्तार भटकंती’तर्फेही येत्या १ ते २ सप्टेंबर आणि १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ८४५४८४३६८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
वरंध घाट, शिवथरघळ वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी वरंधघाट, शिवथरघळ, आंबवडेचा झुलता पूल, नागेश्वर मंदिर, भाटघर अशा वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
ट्रेक डायरी: ज्येष्ठ नागरिकांसाठी रायगड मोहीम
‘उन्नयन’ संस्थेतर्फे २८ व २९ सप्टेंबर रोजी ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी रायगड सहलीचे (रोप-वे मार्गे) आयोजन करण्यात आले आहे. अभ्यासकांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या या सहलीमध्ये ज्येष्ठांच्या काळजीसाठी एका
First published on: 09-08-2013 at 09:44 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary