ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द्र-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५०हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे येथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे १७ ते २१ मार्च २०१५ या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फणसाड अभयारण्य सहल
‘सेव्ह अवर प्लॅनेट’ तर्फे येत्या २४ ते २५ जानेवारी दरम्यान रायगड जिल्हय़ातील फणसाड अभयारण्यात अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अभयारण्यातील जैवविविधतेचे दर्शन, समुद्रकिनाऱ्यास भेट आणि आकाशदर्शन आदी गोष्टींचे या सहलीत आकर्षण आहे. अधिक माहितीसाठी किरण (९८७०२८६५५८) यांच्याशी संपर्क साधावा.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary