हिमालयातील पदभ्रमण मोहिमा
‘झेप’ संस्थेतर्फे आगामी सुटीत हिमालयाच्या विविध भागांत पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे. बागेश्वर-नैनिताल (कुमांऊ गढवाल), मनाली, दोडीताल-दारवा, मणिमहेश ग्लेशिअर आदी भागांत या हिमालयातील पदभ्रमण मोहिमांचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९८२२२९७२९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जलदुर्गाची मोहीम
‘नोमॅड्स’तर्फे येत्या १० ते १४ मार्च दरम्यान सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जयगड अशी जलदुर्गाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
हरिश्चंद्रगड पदभ्रमण
‘आव्हान’तर्फे येत्या १६-१७ मार्च दरम्यान हरिश्चंद्रगडावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८३३३४४५१० या क्रमांकावर संपर्क साधावा.

ईशान्य भारतात भटकंती
निसर्गसौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल, मेघालय या राज्यांत यूथ होस्टेलच्या महाराष्ट्र शाखेतर्फे एप्रिल महिन्यात
१२ दिवसांची विशेष भटकंती आखण्यात आली आहे. या भटकंतीची सुरुवात गुवाहाटीपासून होणार आहे. गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे काझीरंगा अभयारण्य, उगवत्या सूर्याच्या प्रदेशातील नयनरम्य तवांग, देशात सर्वात जास्त पर्जन्यमान असणारे चेरापुंजी, शिलाँग, बोमदिला, भालुकपांग, तेजपूर या ठिकाणांना भेटी देता येतील. अधिक माहितीसाठी यूथ
होस्टेल महाराष्ट्र शाखेशी- ०२२-२४१२६००४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

रणथंबोर टायगर सफारी
राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. या जंगलातच इसवी सन ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. हे जंगल पाहण्यासाठी ‘आसमंत’च्या वतीने १७ ते २१ मे दरम्यान निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९९३०६६०७३१) यांच्याशी संपर्क साधावा.

बांधवगड दर्शन
‘निसर्ग सोबती’ तर्फे येत्या ६ ते ९ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. सध्या व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झालेल्या या ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader