धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  abhijit.belhekar@expressindia.com

लोहगड पदभ्रमण
‘एसपीआर’तर्फे येत्या १९ जुलै रोजी लोहगडावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

amaltash movie
सरले सारे तरीही…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
Which is the best time to exercise
तुम्हालाही व्यायामाची आवड आहे? मग, थांबा… कधीही व्यायाम केल्याने उदभवू शकतात गंभीर समस्या
Army Exhibition Pune, Devendra Fadnavis ,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लष्कराच्या प्रदर्शनाचे उद्घाटन… मुख्यमंत्री काय म्हणाले?

राजमाची पदभ्रमण
‘दी नेचर लव्हर्स’तर्फे येत्या २० जुलै रोजी राजमाची किल्ला परिसरात वर्षां भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी गणेश काळे (९८१९०२६३०५) यांच्याशी संपक साधावा.

बांधवगड सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील बांधवगड येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.

भीमाशंकर वर्षां भ्रमंती
‘वसुंधरा आऊटडोअर्स’तर्फे येत्या २० जुलै रोजी भीमाशंकर परिसरात वर्षां भटकंतीचे आयोजन केले आहे. या भटकंतीत भीमाशंकर अभयारण्यातील वन्यजीवनाचा वेध घेतला जाणार आहे. तसेच भीमाशंकर येथील ऐतिहासिक मंदिरालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.

मढे घाट वर्षां भ्रमंती
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या २० जुलै रोजी मढे घाटात भ्रमंतीचे आयोजन केले आहे. सहय़ाद्रीच्या घाटमाथ्यावरील ही भटकंती तोरणागडाच्या कुशीतून होणार आहे. सहय़ाद्रीचा रांगडा भूगोल, त्यावरील इतिहास आणि त्याला सौंदर्य बहाल करणारा वर्षांऋतू या साऱ्यांतून ही भटकंती आनंददायी ठरणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader