धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभ्या खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. या वेळी कुणी फुलांच्या अभ्यासासाठी, कुणी छायाचित्रणासाठी तर कुणी निव्वळ त्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी कासची वाट पकडते. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २० आणि २१ सप्टेंबरदरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
वरंध घाट, शिवथरघळ वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या ३१ ऑगस्ट रोजी भोर, भाटघर, नीरा देवधर धरण, वरंध घाट, शिवथरघळ परिसरात वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
गोव्यातील जंगलसफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे १२ ते १५ डिसेंबर दरम्यान गोव्यातील तांबडी सुरला, बोंडला आणि भगवान महावीर अभयारण्यात भटकंतीचे आयोजन केले आहे. पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी या अभयारण्याची सफर उपयुक्त ठरेल. या जंगलात मलबार ट्रोगोन, ग्रे हेडेड बुलबुल, मलबार बार्बेट, विविध प्रकारचे खंडय़ा, धनेश आदी पक्ष्यांचे दर्शन घडते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.
धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या ३० ते ३१ ऑगस्ट दरम्यान ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर आदी धबधब्यांच्या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
दूधसागर, जंगलभ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या ६ ते ७ सप्टेंबर रोजी गोव्यातील दूधसागर धबधबा आणि जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.
कास पठार सहल
सप्टेंबर महिना लागला, की निसर्गभटक्यांना कास पठाराचे वेध लागतात. पावसाळी रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेले हे पठार या दिवसांत बहरून येते. हे पठार आणि ठोसेघर धबधब्याच्या सहलीचे कल्पविहार संस्थेतर्फे २१-२२ सप्टेंबर रोजी आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विकास जयवंत (९९३०९३५१९३) यांच्याशी संपर्क साधावा.