‘इनसर्च आऊटडोअर्स’ संस्थेतर्फे २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत पश्चिम बंगालमधील सुंदरबन राष्ट्रीय उद्यानात व्याघ्रदर्शन सहल आयोजित केली आहे. सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. हे उद्यान मुख्यत्वे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आहे. ज्यात ५४ बेटांचा समावेश होतो. सुंदरबनचा विस्तार कित्येक हजार चौरस किमीचा आहे. त्यातील खूपच छोटा भाग भारतात येतो बहुतांशी भाग हा बांगलादेशात आहे. वाघांच्या समाधानकारक संख्येसोबतच इथे चितळांची संख्याही मोठी आहे. येथील चितळांचे खूर इतर चितळांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत. अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसेच मोठय़ा प्रमाणावर आढळणारे वन्यप्राणी व पक्षी यामुळे याची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे. या सफारीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ८४१९९५४९८४ किंवा ९८५०८२६४३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
निसर्ग छायाचित्रण शिबीर
‘हिरवाई’ संस्थेतर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत वन्यजीव छायाचित्रण शिबिराचे आयोजन केले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जगातले पहिल्या क्रमांकाचे ‘सिटी फॉरेस्ट’ म्हणून ओळखले जाते. या शिबिरात national geographic chanel चे वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार सौरभ महाडिक हे शिबिरार्थीना वन्यजीवन व निसर्ग कसा टिपावा यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकांवर संपर्क करावा..
कोकणदिवा पदभ्रमण
‘माऊंटन हायकर्स’ तर्फे येत्या १७ नोव्हेंबर रोजी कोकणदिवा पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आदित्य फडतरे (९७३०८९५६७८) किंवा आप्पा देशपांडे (९४२२००५२१७) यांच्याशी संपर्क साधावा.
साल्हेर-मुल्हेर-सालोटा पदभ्रमण
‘डोंगरी-अ‍ॅन ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅडव्हेंचर’ संस्थेच्या वतीने २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत साल्हेर-मुल्हेर-सालोटा येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सुधीर जोशी (९८६७०५८२४७) यांच्याशी संपर्क साधावा.
चंदेरीगड भ्रमंती
‘एसपीआर हायकर्स’ तर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी कर्जतजवळील चंदेरीगड भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा चिमट (९९२०३६०३३६) आणि राजेंद्र जाधव (८६९१८३७८३३) यांच्याशी संपर्क साधावा.
भिगवण पक्षी निरीक्षण सहल
ट्वाईन आऊटडोअर्सतर्फे १४ ते १५ डिसेंबर रोजी बारामतीजवळ भिगवण येथे पक्षी निरीक्षण सहल आयोजित करण्यात आली आहे. उजनी धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरामध्ये हिवाळ्यात मोठय़ा संख्येने स्थानिक तसेच स्थलांतरीत पक्षी पहायला मिळतात. या सहलीमध्ये प्लेमिंगो, स्पूनबिल, पेंटेड स्टॉक, सँडपायपर्स, बार हेडेड गीझ, करकोचे असे विविध प्रकारचे पक्षी पहायची संधी मिळेल. तसेच पक्षी निरीक्षणासाठी नौका सफरदेखील आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अर्चिस सहस्त्रबुद्धे ९८९२१७२४६७ किंवा पराग जोशी ९८३३५२४२४८.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा