रूपीन पास ट्रेक
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यांच्या दरम्यान एका खोऱ्यातून जाणारा हा एक निसर्गरम्य ट्रेक. साधारण १५,२५० फूट उंचीवरून जाणाऱ्या या ट्रेकमध्ये हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचे खूप सुंदर दर्शन घडते. साहस, निसर्ग आणि छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी हा ट्रेक वेगळे आकर्षण ठरू शकतो. ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ४ जून, १४ जून आणि २७ जूनपासून या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केलेले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
रायगड दर्शन
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडाच्या अभ्यास सहलीचे ‘होरायझन’तर्फे १५ ते १७ मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सहलीत अभ्यासकांच्या नजरेतून रायगडाच्या इतिहासाचे, तिथल्या स्थापत्याचे दर्शन घडवले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शंकर राऊत (९९६९६३४३४४) किंवा निलाक्षी पाटील (७५०६९८८१२९) यांच्याशी संपर्क साधावा.
लडाख दुचाकी सफारी
‘एसपीआर’तर्फे येत्या २५ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान लेह-लडाख परिसरात दुचाकीवर भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.
बांफ माऊंटन फिल्म फेस्टिवल
एक पाय गमावलेला असूनही कुणी स्किईंग करतोय, कुणी त्या चिमुरडय़ा वयातही प्रस्तरारोहण करत आहे, कुणी सुळक्यांच्या कुशीत सायकलिंग करत आहे, कुणाचे अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात शोधकार्य सुरू आहे.. या अशा साहसाच्या वाटेवरील अचाट कथा प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्यास मिळणार आहेत. निमित्त आहे, नाशिकमध्ये आयोजित ‘बांफ माऊंटन फिल्म फेस्टिवल’चे. नाशिकच्या वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या वतीने १० मे रोजी याचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये या विषयावरील एकूण १३ चित्रपट दाखवले जाणार आहेत. शहरातील गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात या चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. अधिक माहितीसाठी राहुल सोनावणे (९३७३९००२१९) किंवा प्रशांत परदेशी (९०११७०३७०३) यांच्याशी संपर्क साधावा.