चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे एक अग्रगण्य जंगल मानले जाते. वाघांशिवाय इथे बिबटय़ा, अस्वल, गवे, रानकुत्री, सांबर, चितळ असे अनेक प्राणी इथे दिसतात. ताडोबाच्या तलावात मगरी आहेत. या जंगलात स्वर्गीय नर्तक, नवरंग आदी दुर्मिळ पक्षीही दिसतात. साग, ऐन, बिजा, धावडा, हैदू, तेंदू आदी वनस्पती इथले वैशिष्टय़ आहे. अशा या ताडोबाच्या सफारीचे ‘विस्तार’ संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८४५४८४३६८४ किंवा ९९३०५६१६६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
लक्षद्वीप दौरा
कल्पविहार अॅडव्हेंचर्स या गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने लक्षद्वीप या बेटसमूहावर ३ मार्च ते १० मार्च या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आह़े यात सहभागी होण्यासाठी १५ नोव्हेंबपर्यंत नोंदणी करता येणार आह़े नोंदणीसाठी संपर्क – ९८२०६८४७२३़
मानस राष्ट्रीय उद्यान
हिमालयाच्या पायथ्यालगत आसाममध्ये असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यान सफारीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजन केले आहे. भूतानशी संलग्न असलेल्या या जंगलातून मानस नदीचा प्रवाह वाहतो. या जंगलात हत्ती, वाघ, बिबटय़ा आदी सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती आढळतात. बंगाल तणमोर, थोरला धनेश आदी पक्ष्यांचे दर्शन घडते. फुलपाखरे आणि ऑर्किडसाठीही हे मानस सरोवर प्रसिद्ध आहे. अधिक माहितीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
गिर्यारोहक स्टीव स्वेन्सन यांची मुलाखत
द हिमालयन क्लब संस्थेच्या मुंबई विभागातर्फे बुधवारी ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता दादर माटुंगा कल्चर सेंटरमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमेरिकन गिर्यारोहक स्टीव स्वेन्सन यांची मुलाखती होणार आहे. संध्याकाळी सहा ते साडे सहा या वेळेत नावनोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पावणे सात ते पावणे आठ यावेळेत पुरस्कारप्राप्त लघुपट दाखविण्यात येणार आहे. रात्री आठ ते नऊ यावेळेत स्टीव स्वेन्सन यांची मुलाखत हरीश कपाडिया घेणार आहेत. स्टीव स्वेन्सन आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी २९११ मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सासेर कांगरी-२ हे (७,५१८ मीटर उंच) शिखरावर यशस्वी चढाई केली होती. त्यांनी केलेल्या या चढाईला द हिमालयन जर्नल ने एका तपातील सवरेत्कृष्ट आरोहण म्हणून गौरवले आहे.
या शिखर चढाईच्या लघुपटाला दी पायोलेट दी ओर हा फ्रान्समधील गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान एप्रिल महिन्यात बहाल करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी राजन महाजन यांच्याशी ९८३३४८५४५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोकण दर्शन
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी कोकण अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत वेळास येथील कासव संवर्धन, बाणकोट, फत्तेगड, गोवा, कणकदुर्ग किल्ला, आंजर्ले येथील गणपती मंदिर, हर्णे बंदर आणि सुवर्णदुर्ग आदी ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
‘निसर्ग सोबती’ संस्थेच्या वतीने १३ ते १८ जानेवारी २०१३ या कालावधीत राजस्थानमधील भरतपूर पक्षी अभयारण्य सहलीचे आयोजन केले आहे. भरतपूर हे येथील महाराजांचे मूळचे शिकारीचे राखीव जंगल होते. पुढे त्यास १९५६ मध्ये पक्षी अभयारण्याचा दर्जा देत त्याचे ‘केवलोदेव घाना पक्षी अभयारण्य’ असे नाव ठेवण्यात आले. या अभयारण्यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तब्बल २९ चौरस किमी. क्षेत्रफळात पसरलेल्या या अभयारण्यात कान्डेसर, काळ्या मानेचा करकोचा, पानकावळे, सर्पपक्षी, मराल बदक, बगळे असे साडेतीनशेपेक्षा अधिक प्रजातीचे लाखो पक्षी हिवाळ्यात वास्तव्यास येतात. तेच पाहण्यासाठी ‘निसर्ग सोबती’ ने या सफारीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा