पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण
‘शिवशौर्य ट्रेकर्स’तर्फे येत्या २० ते २३ जुलै दरम्यान पन्हाळा -पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढ वद्य प्रतिपदेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावरून निघून पावनखिंडमार्गे विशाळगडावर पोहोचले होते. या वेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत आपल्या प्राणाची आहुती देत महाराजांची वाट निर्धोक केली होती. यंदा या रणसंग्रामास ३५३ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मृतिप्रीत्यर्थ बरोबर या दिवशी पन्हाळा -पावनखिंड – विशाळगड पदभ्रमण या मोहिमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम शिवाजीमहाराज ज्या वाटेने गेली त्याच वाटेने जाणार आहे. या मोहिमेदरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९३२०७५५५३९, ९८६९१०९९७० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’
‘ट्रेकडी’ संस्थेतर्फे येत्या ६ ते १४ जुलै दरम्यान हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि हेमकुंड अशा भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२५४५४२०५ किंवा ९८२२४४४९६३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

कान्हा व्याघ्र प्रकल्प
‘इनसर्च आऊटडोअर्स’तर्फे येत्या १८ जून रोजी कान्हा व्याघ्र प्रकल्प सफरीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२५४४३०९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

लेह-लडाख सफर
‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या २० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान लेह-लडाख सफारीचे आयोजन केले आहे. ‘शीत वाळवंट’म्हणून प्रसिद्ध असलेले लडाख निसर्गसौंदर्याने संपन्न आहे. बर्फाळ पर्वतरांगा, निळेशार तलाव, आगळे वन्यजीवन, सर्वात उंचीवरचे रस्ते, खारदुंगला सारख्या उत्तुंग खिंडी, बौद्ध धर्मस्थळे, राजवाडे आदी अनेक आकर्षणे या सफारीमध्ये दडलेली आहेत. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी लडाख एक मेजवानी आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी विशाल शेटे (९८२०२८४३९१) यांच्याशी संपर्क साधावा.

आफ्रिकन सफारी – केनिया
बारा वेळा यशस्वीपणे केनिया शिबिर केल्यानंतर ‘बीएनएचएस’तर्फे यंदा १० ते १९ ऑगस्ट दरम्यान पुन्हा ‘आफ्रिकन सफारी’चे आयोजन केले आहे. या सफारीमध्ये उत्तर केनियातील साम्बरु राष्ट्रीय उद्यानदर्शन, नैवाशा सरोवरात होडीने पाणघोडे-पाणपक्षी पाहणे, क्रेसेंट बेटावर पदभ्रमण, नाकुरू सरोवरात रोहीत पक्षी पाहणे, मसाई मारातील भ्रमंती केली जाणार आहे. वन्यजीवांच्या या पंढरीत दीडशे जातीचे पक्षी आणि ३० जातीचे प्राणी आढळतात. आफ्रिकी सिंह, चित्ता, दोन शिंगी गेंडे, रानरेडे, ठिपकेवाले तरस, आफ्रिकन हत्ती, नाईल मगर आदी प्राणी तसेच शहामृग, लावण्य मैना, धनेश, माळढोक आदी दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात.  अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाऊस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.

वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या २२ व २३ जून रोजी शिवथरघळ, वरंधा घाट, भोरचा राजवाडा, भाटघर धरण या स्थळांवर वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव लिहूनही आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
Email – abhijit.belhekar@expressindia.com

Story img Loader