* रायरेश्वर सहल
‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त रायरेश्वर, कारी, आंबवडे अशा भ्रंमतीचे आयोजन केले आहे. रायरेश्वर पठारावरील शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. तर कारी येथे स्वराज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या कान्होजी जेधे यांची समाधी आहे. आंबेगाव येथील झुलता पूल, नागेश्वर मंदिर आदी स्थळे या सहलीत दाखवली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
* ‘ट्वीन आऊटडोअर्स’च्या संगतीत
ट्वीन आऊटडोअर्सच्यावतीने पेंच येथे ९ ते ११ नोव्हेंबर व ताडोबा ये १४ ते १६ डिसेंबर दरम्यान वन्य जीवनाची सहल अनुभविण्यासाठी संपर्क अर्चिस सहस्रबुद्धे – ९८९२१७२४६७ व विद्यानंद जोशी -९८३३४६४०३३
* जंगल सफारीचे आयोजन
जंगल कब संस्थेतर्फे दिवाळी आणि नाताळच्या सुटीत ताडोबा, पेंच, नागझिरा, कान्हा, बांधवगड आदी व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२४४९९९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
* नामदाफा राष्ट्रीय उद्यान सफर
अरुणाचल प्रदेशमधील नामदाफा राष्ट्रीय उद्यानाच्या सफरीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने आयोजन केले आहे. २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या अभ्यास सहलीच्या अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
* अलंग-मदनगड मोहीम
‘अ‍ॅडव्हेंचर लाईफ’तर्फे येत्या १२ ऑक्टोबर रोजी अलंग आणि मदनगडावर भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या मोहिमेमध्ये ‘रॉक क्लायंबिंग’चा अनुभव घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०८२२१११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा