आयएएस आणि आयपीएस होण्यासाठी कित्येक वर्षे कष्ट घेऊन कुटुंबातील एखादा तरुण किंवा युवती या पदावर जाते. महत्प्रयासाने अधिकारी पद मिळवणे हे खऱ्या अर्थाने तुमचे कसब दाखवणारे असते. अनेक कुटुंबातील एखादी मुलगी किंवा मुलगा तरी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी धडपडत असतो. काही वर्षांनी तो यामध्ये यशस्वी होऊन सेवेत दाखलही होतो. मात्र एकाच कुटुंबातील तब्बल ४ बहीण-भाऊ प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण हो हे खरं आहे, प्रतापगड जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील मिश्रा कुटुंबातील हे बहीण-भाऊ आहेत.
Viral Video : ‘कॅप्टन कूल’ धोनीचे नृत्य कौशल्य पाहून पत्नीलाही हसू आवरेना
क्षमा आणि माधवी या दोन बहिणी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तयारी करत होत्या. त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल रक्षाबंधनाच्या दिवशी लागला. मात्र यामध्ये त्या अपयशी झाल्या होत्या. त्यांचा मोठा भाऊ योगेश त्यांना दुसऱ्या दिवशी भेटायला आला आणि त्यांचा खचलेला आत्मविश्वास वाढविण्याचा त्याने प्रयत्न केला. विशेष म्हणजे तो इतकंच करुन थांबला नाही तर आपल्या लहान बहिणींना प्रेरणा देण्यासाठी स्वतः ही परीक्षा द्यायची ठरवली. योगेश सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि तो पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी झालाही. त्यामुळे बहिणींसमोर त्याचा हा प्रवास आदर्श असा ठरला. भावापासून प्रेरणा घेऊन या दोघीही नंतर आयएएस झाल्या.
Viral Video : १८० अंशात मान फिरवणारा मुलगा पाहिलाय कधी?
यानंतर त्यांचा लहान भाऊ लोकेश हाही इंजिनिअरिंगनंतर यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस झाला. चौघांमध्ये वयाचाही फारसा फरक नाही, त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघे बहीण-भाऊ पहिल्यांदाच अशापद्धतीने प्रशासकीय सेवेत दाखल झाले असतील असा अंदाज आहे. विशेष म्हणजे घरची परिस्थिती अतिशय बेताची असताना या चौघांनी हे यश संपादन केले आहे.