आयफोन घ्यायचा झाला तर खिसा भरलेला पाहिजेच. आयफोनचं सुबक डिझाईन, ते जबरदस्त अॅप स्टोअर, अॅपलची फेमस प्रोसेसिंग चिप हे काय स्वस्तात मिळतं का? आयफोन घेतल्यावर आपसूक येणारं स्टेटस ते वेगळंच.

पण आता अॅपलचे सीईओ टिम कुक यांचाच खिसा हलका झालाय. अायफोनच्या विक्रीत इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच घट झाल्याने कंपनीने त्यांचा पगार कमी केलाय.

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

२००७ मध्ये पहिला आयफोन लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे. अॅपलच्या  स्टीव्ह जाॅब्सनी आयफोन लाँच करत टेक्नाॅलाॅजी क्षेत्रात धुमाकूळ घातला. त्याआधी आलेल्या आयपाॅडने जगभरात म्युझिकप्रेमींच्या आयुष्यात क्रांती आणली होती. तोपर्यंत पोर्टेबल सीडी प्लेअर्स वापरत १०-२० गाणी एेकत बसणाऱ्यांच्या हातात ‘जीबीच्या जीबी’ मेमरी असणारा आयपाॅड आला आणि त्यांचं सगळं म्युझिक कलेक्शन त्यांच्यासोबत राहू लागलं. या प्रचंड यशावर स्वार होत २००७ मध्ये आयफोन आला आणि बड्या बड्या कंपन्यांचं धाबं दणाणलं. आपल्याकडे असणाऱ्या टेक्नाॅलाॅजीच्या जोरावर अॅपलने स्मार्टफोनचं नवीन विश्व बनवलं. जगातल्या बहुतांश स्मार्टफोन्सवर गूगलची अँड्राँईड आॅपरेटिंग सिस्टिम असली तरी गुणवत्तेच्या बाबतीत अॅपल कितीतरी पुढे होतं. एवढे महागाचे फोन्स कोण घेणार नाही हा समज गेली दहा वर्ष खोटा ठरवत अायफोन एक स्टेटस सिंबाॅल बनला.

पण हे वर्ष जरा वेगळं होतं. यावर्षी लाँच झालेल्या आयफोन ७ सीरिजच्या ‘सर्वात स्वस्त’ फोनची किंमतच होती ६० हजाराच्या घरात. आणखी चांगला फोन हवाय? मेमरी जास्त हवीय? मोजा आणखी पैसे. या सीरिजमधल्या सर्वात महाग फोन्सनी लाखाचा आकडा गाठला. याशिवाय यावर्षी अॅपलने ‘एअर पाॅड्स’ नावाचं एक नवीन प्रकरण बाजारात आणलं. हे आहेत नव्या आयफोनचे खास वायरलेस इयरफोन्स. बाकीचे इयऱफोन्स या आयफोन्सला कनेक्टच होत नाहीत. या एअर पाॅड्साठी आणखी १५ हजार रूपये जास्त. म्हणजे लाखाच्या हँडसेटला स्वस्तातले इयरफोन्स लावण्याचा मार्गसुध्दा टाळं लावून बंद!

अॅपलने जगभरात वापरलेल्या या स्ट्रॅटेजीचा व्हायचा तोच परिणाम होत जवळपास सगळ्याच जागतिक बाजारपेठांमध्ये आयफोन ७ ला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि गेली १० वर्ष स्मार्टफोन्स विश्वावर राज्य गाजवणाऱ्या अॅपलच्या उत्पन्नात पहिल्यांदाच घट झाली.

याचा फटका अॅपलचे सीईओ टिम कुक यांना बसलाय. अॅपलच्या एकूण  उत्पन्नात १५ टक्के घट आली म्हणून त्यांचा पगार १५ टक्क्यांनी कमी केलाय गेलाय.

स्टीव्ह जाॅब्सनी ते हयात असताना स्वत: सीईओपदी नेमणूक केलेल्या टिम कुक यांच्या प्रतिमेला हा मोठा धक्का आहे. स्टीव्ह जाॅब्स यांचं निधन झाल्यावर कुक यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली लाँच केलेल्या ‘अॅपल वाॅच’ सारख्या नवीन स्मार्ट गॅजेट्सना म्हणावा तसा प्रतिसाद किंवा त्या प्राॅडक्ट्सचे स्वत:चे असे चाहते निर्माण अजूनतरी झाल्याचं दिसत नाहीये.

१५ टक्के पगारकपातीमुळे टिम कुकना आर्थिक फटका वगैरे बसणार नाहीये. २०१७ साली त्यांनी ८७ लाख डाॅलर्स फक्त पगाराच्या रूपात मिळणार आहेत. पण त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय हे निश्चित.

स्टेटस सिंबाॅल असणारा आयफोन सर्वसामान्यांच्या आवाक्यात कधीही नव्हता. पण गरजेपेक्षा जरा जास्तच एक्सक्लुझिव्हिटी तसंच डोळे पांढरे करणारे दर याच्यामुळे आता तो उच्च- मध्यमवर्गीयांच्याही आवाक्यापलीकडे जायला लागलाय. हातात असलेली बाजारपेठ अॅपलच्या हातून सुटते की काय असं वाटायला लागलंय. ‘अॅपल’ने टिम कुकचा पगार कापून हाच इशारा त्यांना दिला असावा.