जगात ‘डेअरडेव्हील’ची काही कमी नाही. ‘आज कुछ तूफानी करते है’ असं म्हणत ही मंडळी कधी काय करतील याचा नेम नसतो. आपला जीव धोक्यात घालून वेगवेगळे स्टंट करणे यांच्यासाठी नेहमीचेच झाले आहे. हा जीवघेणा खेळ कधी घात करेल सांगत येत नाही. पण जीव धोक्यात घालून मृत्यूला जवळून अनुभवण्याची झिंग अशी चढली असते की त्यापुढे जगातील प्रत्येक गोष्ट त्यांना क्षुल्लक वाटू लागते. असाच एक डेअरडेव्हीलचे आहे Oleg Sherstyachenko. आपल्या जीवघेण्या स्टंटमुळे युट्युबवर तो प्रसिद्ध आहे. पण सध्या युट्युब आणि फेसबुकवर ओलेगची जरा जास्त हवा आहे. आपल्या युट्युब चॅनेलवर त्यांने ‘सॅव्हेज इन हाँग काँग’ या नावाने एक व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरील ‘हा’ वॉलपेपर यांनी केला होता क्लिक…

ओलेगने आतापर्यंत अनेक स्टंट केले आहे. जगातल्या उंचच उंच इमारतीच्या टेरेसवर चढून धोकादायक स्टंट करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. कधी गगनचुंबी इमारतीच्या कडेवर स्केटिंग करणे, कधी समर सॉल्ट मारणं तर कधी, कडेवरून चालत जाणे असे एक दोन नाही तर काळजाचा ठोका चुकवणारे कितीतरी स्टंट त्याने केले आहे. ओलेगला आता या स्ंटटची सवय झाली असली तर बघण्या-या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला नाही तर नवलच म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वी त्याने दुबईतल्या गगनचुंब इमारतीच्या टेरेसवर स्टंट केले होते. आता गेल्याच आठवड्यात त्याने हाँगकाँगच्या एका गगनचुंबी इमारतीवर स्टंट करतानाचा फोटो अपलोड केला. या स्टंटमुळे तो वादत सापडण्याचीही शक्यता आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार या स्ंटटबाजीवर आता चौकशी सुरु आहे. जर यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकतो. पण ओलेगचा एकंदर स्वभाव पाहता त्याला याने फारसा फरक पडणार नाही असेच दिसते. ओलेग तरुणांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. ज्यांना असे जीवघेणे स्टंट आवडतात त्यांना ओलेगची ही स्ंटटबाजी नक्कीच पसंत पडले.