गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. जगातील १५० हून अधिक देशात विविध भाषांमध्ये गुगल आपली सेवा देत आहे. गुगलवर अगदी कोणत्याही गोष्टींची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते, समजायला आणि हाताळायलाही सोपं असल्याने गुगल अल्पावधितच लोकप्रिय झालं. या गुगलचा आज १९ वा वाढदिवस आहे. आता जरी या गुगलचं स्वरुप वेगळं दिसत असलं तरी गेल्या १९ वर्षांत गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये अनेक बदल केलेत. टप्प्याटप्प्याने गुगलने हे बदल घडवून आणले. तेव्हा काही वर्षांपूर्वी गुगल सर्च इंजिन कसं दिसायचं याचे काही निवडक स्क्रीन शॉर्ट अभ्यासासाठी काही विद्यापीठांनी काढून ठेवले आहे, त्यातले काही निवडक स्क्रीन शॉर्ट आणि त्याची माहिती.

१९९८ मध्ये जेव्हा गुगल लाँच झालं होतं तेव्हा ते अशाप्रकारे दिसायचं. त्यावेळी गुगलचा लोगोही वेगळा होता.

२००१ मध्ये गुगलनं पुन्हा एकदा आपल्या होमपेजमध्ये काही बदल केले. यावेळी लोगोचा फाँट बदलला. सर्च पर्यायाखाली गुगल ताज्या घडामोडीसंदर्भात बातम्याही देऊ लागलं. यावेळी गुगलंनं होम पेजवर ‘TM’ देखील लावायला सुरूवात केली.

२००७ मध्ये माहितीसोबतचं त्या माहितीसंदर्भातील काही युट्युब व्हिडिओही आपल्या सर्च इंजिनमध्ये उपलब्ध करून दिले.

२०१० मध्ये गुगलंच सर्च इंजिन अधिकाअधिक साधं आणि सोप करण्यात आलं. सर्च बारच्या खाली ‘गुगल सर्च’ आणि ‘आय एम फिलिंग लकी’चा पर्याय दिला होता. हा पर्याय याआधीही होता पण २०१० मध्ये त्यांनी हा पर्याय हटवून तिथे ‘आय एम पझल्ड’चा पर्याय दिला होता.