पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर असावा की नाही यावरुन मागील काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच आता या फोटोमुळे परदेशात विमानतळावर सुरक्षा यंत्रणांचा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवरुन आपल्या मैत्रिणीसोबत घडलेला किस्सा सांगितला आहे.

लंडनला जाताना जर्मनीची आर्थिक राजधानी असणाऱ्या फ्रँकफर्ट विमानतळावर पोहचलेल्या दीप्ती यांच्याकडे लसीकरणाच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर काय घडलं हे असीम यांनी सांगितलं. “तिने सर्टिफिकेट दाखविले तेव्हा ते म्हणाले, अहो तुमचे सर्टिफिकेट द्या हे कुणाचे तरी दुसऱ्याचेच आहे. तिने जेव्हा सांगितले की हे माझेच आहे आणि हा फोटो आमच्या पंतप्रधानांचा आहे तेव्हा एअरपोर्ट वरील स्टाफ तो फोटो बघून खळखळून हसत होता,” असं असीम म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “असे ओशाळवाने अनुभव किती जणांना आले असतील. भारतीय लोकांची शोभा करणारा व खजील करणारा अनुभव दीप्ती ताम्हाणे हिने लिहिला आहे तो जरूर वाचावा,” असं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

नक्की वाचा >> “…नाहीतर मग करोनामुळे निधन झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यावरही मोदींचा फोटो लावा”

Sarode FB Post

दीप्ती ताम्हाणे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

दीप्ती आपल्या पोस्टमध्ये लिहितात, “आम्ही लंडनला जाण्यासाठी फ्रँकफर्ट विमानतळावरील लुफ्तान्साच्या सर्व्हिस डेस्कवर पोहचलो. त्यांनी आमच्याकडे वेगवेगळी कागदपत्रं मागितली. त्यापैकी एक महत्वाचा कागद होता लसीकरण प्रमाणपत्र. आम्ही काऊण्टरवरील महिलेला लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं. तिने प्रमाणपत्रावरील तारीख आणि फोटो पाहिला. तिने त्या लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो आणि पासपोर्टवरील फोटो सारखाच आहे का तपासलं आणि ती संतापली. तिने रागातच हा तुमचा फोटो नाही, असं म्हटलं. तुम्ही मला चुकीचं प्रमाणपत्र दिलं आहे. तिला वाटलं की आम्ही तिला खोटं प्रमाणपत्र देऊन फसवणूक करतोय. मी तिला सांगितलं की तुमचं बरोबर आहे तो फोटो माझा नाहीय. हा फोटो आमच्या माननीय पंतप्रधानांचा आहे. त्यानंतर ती मोठमोठ्याने हसू लागली आणि तिने ते प्रमाणपत्र तिच्या सहकाऱ्यांनाही दाखवलं. त्यांनाही धक्का बसला आणि ते सुद्धा हसू लागले. आम्ही यापूर्वी असं काहीच पाहिलेलं नाही असं ते म्हणाले. त्यांनी आमची प्रमाणपत्र स्वीकारली.”

नक्की वाचा >> Coronavirus: लसीकरण प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नका, कारण…; केंद्र सरकारचा इशारा

Deepti FB Post

यापूर्वीही मोदींचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर हवा की नाही यावरुन वाद झालाय. काही राज्यांनी तर राज्यांच्या अखत्यारित करण्यात आलेल्या लसीकरणावर मोदींचा फोटो काढून मुख्यमंत्र्यांचा फोटो छापलाय.