भारतीयांसाठी रस्त्याच्या समस्या काही नव्या नाहीत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच उकलण्यात आपले दिवस जातात. निवडणुका आल्यात की कुठे वरवर का होईना या रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जातात पण नंतर ये रे माझ्या मागल्या. काही दिवसांनी चालकांचा रस्त्यातील खड्डे चुकवत वाहने चालवण्याचा ‘थरारक’ खेळ पुन्हा सुरू होतो. त्यातून नवीन रस्ते बनवायचे झाले तर वर्षानुवर्षे याचे काम सुरू असल्याचे प्रकार पाहायला मिळतात ते वेगळेच. अनेक गावात तर अर्धे कच्चे तर अर्धे पक्के रस्ते अशी दुर्दैवी अवस्था आहे. दोन दिवसांत रस्ते बांधण्याची कल्पना करणे तर सोडाच येथे दोन दिवसांत रस्त्यांचे खोदकामही पूर्ण होत नाही. म्हणून येथल्या इंजिनिअरने परदेशातील रस्ते बांधण्याचे व्हिडिओ जरुर पाहायला हवे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

वाचा : अहो आश्चर्यम… हे विमानतळ की रेल्वेरुळ?

सोशल व्हिडिओवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. Shire of Moora या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. ऑस्ट्रेलियातल्या मुरामध्ये रस्ते बांधतानाचा तो व्हिडिओ आहे. या भागात फक्त दोन दिवसांत पाच किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला. फक्त ३ कोटी खर्चून हा रस्ता बांधण्यात आला. ड्रोनद्वारे हा रस्ता बनवण्याचे चित्रण करण्यात आले असून सोशल मीडियावर ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही मिनिटांत अत्याधुनिक तंत्र वापरून कच्च्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. आता ही प्रक्रिया किती जलद आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहूनच कळेल.

Viral Video : अबब! या वाहतूक कोंडीला म्हणायचे तरी काय