देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी, विद्यापिठांनी ऑनलाइन क्लासेस आणि लेक्चर्सची सुरुवात केली आहे. मात्र असं असलं तरी देशातील अनेक भागांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणि रेंज मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांना या ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेतला अडचणी येत असल्याचे चित्र दिसत आहे. इंटरनेट नसणे किंवा इतर तांत्रिक कारणं देत काहीजण अशा ऑनलाइन क्लासलाही दांडी मारत असतानाच केरळमधील एक विद्यार्थी मात्र ऑनलाइन क्लासला हजेरी लावण्यासाठी चक्क आपल्या कौलारु घराच्या छप्परावर बसत असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ने दिलं आहे.

या विद्यार्थीनीचे नाव नमिथा नारायणन् असं आहे. ही बीएच्या शेवटच्या वर्षाला असून पाचव्या सेमिस्टरचा अभ्यास करत आहे. कॉलेजने ऑनलाइन माध्यमातून लेक्चर घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र तिच्या घरामध्ये मोबाइल इंटरनेटला चांगली रेंज येत नसल्याने ऑनलाइन लेक्चर पाहताना खूपच अडचणी येतात. त्यामुळेच चांगली रेंज मिळण्याची जागा शोधत शोधत नमिथा थेट घराच्या छप्पारावर जाऊन बसली. सध्या ती तिथूनच लेक्चरला हजेरी लावते. ‘द हिंदू’च्या वृत्तानुसार नमिथाने दोन दिवस घरामध्ये कोणत्या ठिकाणी मोबाइलला चांगली रेंज मिळेल याची चाचपणी केली मात्र काही केल्या तिल्या इंटरनेटवर विनाअडथळा लेक्चर पाहता येईल इतकी रेंज मिळत नव्हती. अखेर घरातील टीव्ही अँण्टीनाला जिथे रेंज येते तिथूनच थोड्या अंतरावर मोबाइलला पूर्ण रेंज असते असं तिच्या लक्षात आलं आणि तिने तिथूनच लेक्चरला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. आता ती शेजाऱ्यांची आणि आजूबाजूच्या लोकांची चिंता न करता वही पेन आणि मोबाइल घेऊन छप्परावर बसूनच अभ्यास करते.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

काही दिवसांनंतर नमिथा घराच्या छप्परावर छत्री घेऊन अभ्यास करुन लागली. पाऊस आणि सूर्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तिने छत्रीचा आधार घेतला आहे. ती तासन् तास छप्परावर बसून मोबाइलवर ऑनलाइन लेक्चर बघत असते.
फोटो सौजन्य: ‘द हिंदू’

छप्परावर चढण्याच्या नादात तिने काही कौलांचे नुकसानही केलं आहे. मात्र तिच्या पालकांचा तिला पूर्ण पाठिंबा असल्याने तिने केवळ शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. तिच्या पालकांनी आता तिला छप्परावर चढता यावं म्हणून लोखंडाच्या शिडीचीही व्यवस्था केली होती. त्याआधी त्यांनी या भागामध्ये सेवा पुरवणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हाडरलाही येथील रेंजसंदर्भात तक्रार केली होती मात्र त्याचा काहीही फायदा झाला नव्हता.